क्रीडा

आता चिडायला लागलोय : अनुपकुमार 

वृत्तसंस्था

पुणे : खेळाडू आणि प्रशिक्षक या जबाबदारीत खूप फरक आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना माझ्यात घडलेला बदल म्हणजे आता मी चिडायला लागलो आहे, असे प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनुप कुमार यांनी सांगितले. 

प्रो-कबड्डी लीगला सुरवात झाली, तशी कर्णधार म्हणून अनुप कुमारचे विविध पैलू दिसून यायला लागले. क्रिकेटमध्ये धोनीने जशी भारताला संयामाने खेळून अखेरच्या षटकापर्यंत सामना नेण्याची आणि जिंकण्याची सवय लावली. तशीच सवय अनुपने कबड्डीत आपल्या यु मुम्बा संघाला लावली. गुणाच्या आघाडी पिछाडीच्या समीकरणात अखेरपर्यंत शांत राहून मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावून अनुपने अनेक विजय मिळविले. त्यामुळेच दुसरा "कॅप्टन कूल' म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.

सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाच्या कर्णधारपदी सुरजितच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसेच नव्या जर्सीचेही अनावरणही करण्यात आले. त्या वेळी अनुपकुमार यांनी प्रशिक्षक या नव्या जबाबदारीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,""खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या जबाबदारी वरुन सारख्या दिसत असल्या तरी प्रशिक्षकपदाची जबाबदारी अधिक कठिण असते. खेळाडू म्हणून खेळताना मैदानावर निर्णय घ्यावे लागतात. कारण, प्रशिक्षक मैदानात येऊ शकत नाहीत.

पण, मैदानाबाहेर प्रशिक्षकाला खेळाडूंना मार्गदर्शन करायचे नसते, सर्वछ खेळाडूंना त्याला जपायचे असते. त्याची तंदुरुस्ती, आहार, खेळ, सराव या सगळ्या गोष्टींबरोबर त्याला संघाच्या वयवस्थापनाकडेही लक्ष द्यायचे असते. प्रशिक्षकाला एका वेळी अनेक आघाड्यांवर लढायचे असते, म्हणून प्रशिक्षकाची जबाबदारी मला अधिक कठिण वाटते. खेळाडू म्हणून कूल राहिलो, पण आता प्रशिक्षकाच्या जबाबदारीमुळे चिडायला लागलोयं.'' 

नवा मोसम, नवे खेळाडू, नवी फ्रॅंचाईजी, माझी भूमिकाही नवी सगळेच नवे असल्यामुळे एका नव्या आणि अचूक नियोजनाने पुणेरी पलटण संघाला मैदानावर उतरवू आणि विजेतेपदापर्यंत मजल मारू असा विश्‍वासही अनुपकुमार यांनी व्यक्त केला. या वेळी उपस्थित कर्णधार सुरजित सिंग, पुणे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल, मुख्या प्रायोजक फोर्स मोटर्सचे मकरंद कानडे उपस्थित होते. या तिघांनीही आपल्या मनोगतामधून अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरीत मोठा फरक पडेल, असे सांगितले. 

प्रो कबड्डीच्या प्रमोशनसाठी घेण्यात आलेली "ऑल स्टार्स' सामना ही भन्नाट कल्पना होती. जागतिक संघ ही कल्पना आम्ही फुटबॉल आणि क्रिकेटमध्येच बघत आलो आहोत. आता कबड्डीतही आली. जागतिक संघ नक्कीच उदयोन्मुख खेळाडूंना खेळायला प्रेरित करेल. 
-अनुप कुमार, पुणे संघाचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT