Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : जय हो! अनुशने जिंकले कांस्य पदक; घोडेस्वारीत पुन्हा रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताने घोडेस्वारीत अजून एक पदकाची कमाई केली आहे. इक्वेस्टेरियन ड्रेसेज वैयक्तिक प्रकारात भारताच्या अनुश अगरवाल्लाने कांस्य पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे एशियन गेम्समधील इक्वेस्टेरियन ड्रेसेज वैयक्तिक प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक आहे.

अनुश अगरवाल्ला हा कायम ए. आर. रेहमानच्या जय हो गाण्यावर आपले कौशल्य दाखवत असतो. त्याने भारतासाठी इक्वेस्टेरियन ड्रेसजमध्ये दुसरे पदक जिंकले. यापूर्वी भारताने सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते.

भारताने एशियन गेम्समध्ये आज आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. शुटिंगमध्ये सरबजोत सिंग, अर्जुन सिंह चीमा आणि शिवा नरवाल यांनी भारताला सहावे सुवर्ण पदक जिंकून दिले होते. त्यांनी 10 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी वुशूमध्ये रोशिबिना देवीने महिला 60 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती.

भारताने आतापर्यंत एशियन गेम्समध्ये 25 पदकांची कामाई केली असून त्यात 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने शुटिंगमध्ये सर्वाधिक 4 सुवर्ण 4 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 13 पदके जिंकली. त्यानंतर क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने 1 सुवर्ण पदक जिंकले आहे.

इक्वेस्टेरियनमध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक अशी दोन पदके जिंकली आहेत. रोईंगमध्ये भारताने 2 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी 5 जिंकली. तर सेलिंगमध्ये एक रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताने वुशूमध्ये एक रौप्य पदक जिंकले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT