क्रीडा

आम्हाला माहितीच नव्हते, वामिकाच्या फोटोंवर अनुष्काची पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचे फोटो कालच्या सामन्यावेळी क्लिक झाले होते.

नवी दिल्ली - विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या मुलीचे फोटो कालच्या सामन्यावेळी क्लिक झाले होते. अचानक कॅमेरा अनुष्का शर्माकडे गेल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या क्युट वामिकासुद्धा (Vamika) व्हिडिओमध्ये दिसली. यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आतापर्यंत विराट आणि अनुष्का यांनी तिचे फोटो शेअर केले, पण यात वामिकाचा चेहरा मात्र त्यांनी दाखवलेला नव्हता. आता तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्काने पुन्हा एकदा सोशल मीडियावरून विनंती केली आहे.

अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत म्हटलं की, आम्हाला समजलं की काल स्टेडियममध्ये मुलीचे फोटो क्लिक झाले. त्यानंतर फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करण्यात आले आहे. आम्ही कॅमेऱ्यात दिसतोय याची कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती. आताही आम्ही आमच्या आधीच्या भूमिकेवरच ठाम असून आधी जशी विनंती केली होती तशीच आताही करत आहे. वामिकाचे फोटो क्लिक किंवा पब्लिश केले नाहीत तर आम्हाला खरंच छान वाटेल. धन्यवाद.

दरम्यान, काही चाहत्यांनी ब्रॉडकास्ट करणाऱ्या वाहिनीवर टीका केली आहे. विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्यात ब्रॉडकास्टर्सनी हस्तक्षेप केल्याचं मत काही युजर्सनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या खासगी आयुष्याचा ब्रॉडकास्टर्सनी आदर करायला हवा असंही युजर्सननी म्हटलंय. रविवारी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत असलेल्या अनुष्काकडे कॅमेरा नेण्यात आला. तेव्हा अनुष्काच्या हातत वामिका होती. काही सेकंदच कॅमेरा दोघींवर होता आणि पहिल्यांदाच विरुष्काच्या मुलीचा चेहरा जगाने पाहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT