Anushka Sharma, Virat Kohli
Anushka Sharma, Virat Kohli 
क्रीडा

विराट, अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह?

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा येत्या डिसेंबरमध्य लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. 

विराटने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबाबत चर्चांना उधान आले आहे. नुकतेच हे दोघे 'मान्यवर'च्या 'मोहे' ब्रॅंडची ऍम्बॅसिडर म्हणून व्हिडिओतून सर्वांसमोर आले होते. 'मोहे'च्या लेगिन्स, साड्या, गाऊन आणि सलवार सूटच्या प्रसिद्धीसाठी अनुष्का काम करणार असून, "मोहे'चे डिझायनर आउटफिट, नवे वेडिंग कलेक्‍शन महिला-युवतींपर्यंत पोचवणार आहे. तसेच मान्यवरच्या नवीन कॅम्पेनिंगमध्येही "मान्यवर'चे ब्रॅंड ऍम्बॅसिडर विराट कोहली यांच्यासोबत अनुष्का नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. 

या जाहिरातीमध्ये विराट अनुष्काला मी तुला आयुष्यभर साथ देईन, असे बोलताना दाखविला आहे. यापूर्वीही हे दोघे अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. तसेच त्याने एकदा भर मैदानात अनुष्काकडे पाहून प्रेमाची कबुली दिलेली आहे. त्यामुळे आता हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यातून विराट विश्रांती घेण्याच्या तयारीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT