Ankita Bhakat Dhiraj Bommadevara  Sakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 Archery Live : भारतीय तिरंदाजांची ऐतिहासिक भरारी! धीरज-अंकिता यांचे पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे

Paris Olympic Archery 2024 India - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत हे पदकाच्या आणखी जवळ पोहोचले आहेत.

Swadesh Ghanekar

India Archery Paris Olympic 2024 : भारताच्या धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीने तिरंदाजीच्या मिश्र गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय जोडीने या कामगिरीसह इतिहास रचला आणि पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आजच सायंकाळी सेमी फायनल होणार आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीत सहज विजय

धीरज आणि अंकिता यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना ५-१ गुणांच्या फरकाने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने ३७-३६ अशा एका पाँइंटच्या फरकाने आघाडी घेतल्याने त्यांना २ गुण मिळाले. दुसरा सेट ३८-३८ असा बरोबरीत राहिल्याने दोन्ही जोड्यांना प्रत्येकी १ गुण मिळाला. त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये ३८-३७ अशा फरकाने भारताने आघाडी घेतली आणि २ गुण मिळवले. त्यामुळे अंकिता आणि धीरज यांनी विजय निश्चित केला.

उपांत्यपूर्व फेरीत आघाडी पण...

उपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीरज यांचा सामना स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीविरुद्ध झाला. स्पेनच्या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनचा पराभव केला होता. भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये ३८-३७ असा विजय मिळवून दोन गुण पदरात घातले. पण स्पॅनिश जोडीने दुसऱ्या सेटमध्ये ३८-३८ असे बरोबरीचे गुण घेत १-१ असे समान गुण खात्यात घातले आणि तिसऱ्या सेटमध्ये दोन गुण घेत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. चौथ्या सेटमध्ये ३८-३७ अशा नेम साधून भारतीय जोडीने ५-३अशी आघाडी केली आणि उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT