Archery World Cup Stage 2 Sakal
क्रीडा

Archery World Cup Stage 2 : विश्वकरंडक कंपाऊंड तिरंदाजी; भारतीय महिला अंतिम फेरीत

भारताचा पुरुष कंपाऊंड संघही जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे; परंतु त्यांना अपेक्षा पूर्ण करण्यात पुन्हा अपयश आले. त्यांना ब्राँझपदकही मिळवता आले नाही.

सकाळ वृत्तसेवा

येचॉन (दक्षिण कोरिया) : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघ विश्वकरंडक स्पर्धेत आपली सुवर्ण मालिका कायम ठेवण्याच्या मार्गावर आहे. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताचा पुरुष कंपाऊंड संघही जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे; परंतु त्यांना अपेक्षा पूर्ण करण्यात पुन्हा अपयश आले. त्यांना ब्राँझपदकही मिळवता आले नाही. ज्योती सुरेखा, परनीत कुमार आणि आदिती स्वामी या महिला संघाने शांघाय येथे गेल्या महिन्यात झालेल्या विश्वकरंडकाच्या पहिल्या टप्प्यात सुवर्णपदक जिंकले आहे.

आज उपांत्य लढतीत त्यांनी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा २३३-२२९ असा पराभव केला. विजेतेपदासाठी त्यांचा सामना तुर्की संघाविरुद्ध होणार आहे. तुर्कीचा संघ जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तुर्कीने दक्षिण कोरियावर २३४-२३३ अशी मात केली.

भारतीय महिला संघासाठी अंतिम फेरीपर्यंतचा हा प्रवास सोपा राहिला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पुढे चाल मिळाली. त्यानंतर या फेरीत त्यांनी इटली संघावर २३६-२३४ अशी सहज मात केली.

पुरुष संघाकडून निराशा

प्रियांश, प्रथमेश आणि अनुभवी अभिषेक वर्मा हा भारताचा पुरुष संघ पात्रता फेरीत चौथ्या स्थानापर्यंत घसरला होता. आज त्यांच्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून १३३-१३३ (१०-१०*) अशा पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर आहे.

भारतीय पुरुष संघाने व्हिएतनामचा २३५-२१२ असा पराभव करून शानदार सुरुवात केली होती; परंतु त्यांना सातत्य राखता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT