Asaduddin Owaisi Criticize BCCI  esakal
क्रीडा

Asaduddin Owaisi : हे कोणतं प्रेम… म्हणत ओवैसींची पाकिस्तानात न खेळणाऱ्या BCCI वर टीका

अनिरुद्ध संकपाळ

Asaduddin Owaisi Criticize BCCI : ऑस्ट्रेलियात 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आणि राजकारण्यांनी या लढतीचा माहोल सेट करण्याचा विडाच उचलला आहे. जय शहांनी भारत आशिया कप 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही असे वक्तव्य केले होते. यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्ड आणि राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. आता या वादात AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खळबळजनक वक्तव्य करत उडी घतली.

खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'तुम्ही उद्या ऑस्ट्रेलियात पाकिस्तानविरूद्ध सामना का खेळत आहात? हा सामने खेळू नये. आपण पाकिस्तानला जाणार नाही. मात्र त्यांच्याशी ऑस्ट्रेलियात खेळणार. हे कोणतं प्रेम आहे? पाकिस्तानसोबत खेळू नका, जर तुम्ही पाकिस्तानसोबत खेळला नाही तर काय होईल? चॅनलचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होईल? हे भारतापेक्षा मोठं आहे का? सोडा खेळू नका!'

ओवैसी पुढे म्हणाले की, 'जर भारत पराभूत होतो त्यावेळी लोक चूक कोणाची झाली हे शोधतात आणि आरडाओरड करतात. तुमची अडचण काय आहे? आमचा हिजाब, दाढी आणि आमच्या क्रिकेट खेळण्याने तुम्हाला अडचण होते. आता सामना कोण जिंकेल हे मला माहिती नाही. मात्र मला भारत जिंकावा असं वाटतं. तसेच मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज सारखी आमच्या मुलांनी पाकिस्तानला हरवण्यासाठी चांगली कामगिरी करावी.'

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर वक्तव्य केलं होतं की भारत 2023 चा आशिया कप पाकिस्तानात जाऊन खेळणार नाही. ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी होईल. यानंतर पाकिस्तानने यावर जोरदार आक्षेप घेत 2023 लाच भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील पाकिस्तानला जायचं की नाही हा निर्णय गृह मंत्रालय करेल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT