Australia vs England Steven Smith esakal
क्रीडा

Ashes : दुसऱ्या दिवशीही कांगारुंनी इंग्लंडला रडवले

अनिरुद्ध संकपाळ

अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात आज ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅम्बुशेग्नेने (Marnus Labuschagne) 103 धावांची शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर (David Warner) पाठापाठ स्टीव्ह स्मिथचेही (Steven Smith) शतक अवघ्या काही धावात हुकले. स्मिथने 93 धावा केल्या. त्याला अॅलेक्स कॅरीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनीही फलंदाजीत आपले मोलाचे योगदान दिले. पदार्पण करणाऱ्या मायकेल नेसेरने 35 धावांची भर घातली तर स्टार्कने 39 धावा केल्या. त्यांच्या 58 धावांच्या भागीदारीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने 473 धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. स्टार्कने रोरी बर्न्सला 4 धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या नेसेरने हासीब हमिदला 6 धावांवर बाद करत इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 17 धावा अशी अवस्था केली.

ऑस्ट्रेलियाने केला 473 धावांवर डाव घोषित, इंग्लंडच्या दिवस अखेर 2 बाद 17 धावा

पदार्पण करणाऱ्या नेसेरने केल्या महत्वपूर्ण 35 धावा, सार्कची 39 धावांची खेळी

वॉर्नर पाठोपाठ स्मिथचेही शतक हुकले; जेम्स अँडरसनेचे कांगारुंना पाठोपाठ दोन धक्के

स्मिथ - कॅरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

कर्णधार स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या डिनरपर्यंत 5 बाद 302 धावा

बेन स्टोक्सचे कांगारुंना दोन धक्के, 294 धावात निम्मा संघ माघारी

रॉबिन्सनने शतकवीर लॅम्बुशग्नेला केले बाद, ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 241 धावा

डेव्हिड वॉर्नरचे हुकले मात्र मार्नस लॅम्बुशग्नेने पूर्ण केले आपले शतक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT