Ashes Test Series esakal
क्रीडा

Ashes : या पठ्याने गुडघे टेकत मारला प्रेमाचा षटकार (Video)

अनिरुद्ध संकपाळ

ब्रिसबेन : अॅशेस मालिकेत (Ashes Test Series) पहिली कसोटीत पहिल्या चेंडूपासूनच रोमांच निर्माण झाला आहे. प्रत्येक दिवशी प्रेक्षकांसाठी उत्तम क्रिकेटची मेजवानी मिळत आहे. या सर्व रोमांचकारक घडामोडीत एका पठ्याने एक रोमँटिक गोष्ट करत सर्वांचेच लक्ष वेधले. (Ashes Test Series Gabba Test Australian fan Proposed his girlfriend on day 3)

गाबा कसोटीच्या (Gabba Test) तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया (Australia) पहिल्या डावात ४०० टप्पा पार करण्याच्या तयारीत होता.ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) आक्रमक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात मजबूत आघाडीही घेतली होती. तोपर्यंत एका ऑस्ट्रेलियाच्या चाहत्याने पॅव्हेलियनमध्ये आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. त्यामुळे सगळे कॅमेरे या पठ्याकडे वळले. ऑस्ट्रेलियाच्या या चाहत्याने गुडघ्यावर बसत आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. अचानक बॉयफ्रेंडकडून लग्नाची मागणी घातली गेल्याने ती गर्लफ्रेंड गोंधळली. मात्र त्यानंतर तिने लगेचच त्याला होकार दिला.

या होकारानंतर त्या ऑस्ट्रेलियन चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला मिठीत घेतली आणि तिचे चुंबन घेतले. त्या ऑस्ट्रेलियन चाहत्याने वेळ न दवडा लगेचच अंगठी आपल्या गर्लफ्रेंडच्या बोटात सरकवली आणि आपले नाते अधिकृत केले.

विशेष म्हणजे अॅशेस मालिकेत (Ashes Test Series) गाबा कसोटीत (Gabba Test) पहिल्यांदाच लग्नाची मागणी घातली गेलेली नाही. यापूर्वी २०१७ मध्येही एका चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी मायकेल नावाच्या चाहत्याने आपला गुडघा टेकवत टोरीला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी आजूबाजूच्या सर्व चाहत्यांनी टोरीने मायकेलला होकार दिल्यानंतर जोरदार जल्लोष केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT