Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : लंकेवर पैशांचा पाऊस! जाणून घ्या, कोणाला-किती मिळाले

आर्थिक तंगीत असलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर बक्षिसाची मिळाली मोठी रक्कम

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले. या विजयासाठी श्रीलंकेला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 1.5 लाख डॉलर्सचा धनादेश कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला. यासोबतच 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज'सह अनेक खेळाडूंना बक्षीस मिळाले आहेत.

श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संघाला 1.5 लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय रुपयानुसार 1.2 कोटी इतकी रक्कम आहे. वानिंदू हसरंगा याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याला 15 हजार डॉलरचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे 12 लाख रुपये आहे. भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना ५ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. तर सामन्यातील सर्वोत्तम झेलसाठी 3 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. पाकला बक्षीस म्हणून 75 हजार डॉलर (सुमारे 60 लाख रुपये) देण्यात आले आहे.

फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंंकेला फलंदाजीला पाचारण केले. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 अशी झाली. मात्र त्यानंतर वानुंदू हसरंगा आणि भानुका राजापक्षेने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला 150 धावांच्या पार पोहचवले. हसरंगाने 21 चेंडूत आक्रमक 36 धावा केल्या. तर भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी कले. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान ठेवले. लंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT