Asia Cup 2023 Gautam Gambhir esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : कॉमेंट्री बॉक्समध्येही होणार तुफान राडा; पाकच्या समालोचकांना गंभीरला सांभाळणं जाणार जड?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 Gautam Gambhir : अनेक वादांनंतर अखेर एशिया कप 2023 येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. क्रिकेट चाहते या स्पर्धेची चातकासारखी वाट पाहत आहेत. कारण याच स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांचा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. यंदा आशिया कप हा हायब्रीड पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. आशिया कपचे 4 सामने हे पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. (Commentary Panel)

या स्पर्धेसाठी एका पाठोपाठ एक देश आपला संघ जाहीर करत आहेत. त्याचबरोबर आशिया कपसाठी कोण कोण समालोचन करणार याची देखील यादी जाहीर झाली आहे. या यादीत भारताचे आणि पाकिस्तानचे काही दिग्गज माजी खेळाडू देखील आहेत. त्यामुळे मैदानाबरोबरच कॉमेंट्री बॉक्समधील वातावर देखील तापणार हे नक्की.

आशिया कप 2023 साठी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबतच रवी शास्त्री, संजय मांजरेकर, इरफान पठाण आणि दीप दास गुप्ता देखील समालोचन करणार आहेत. तर पाकिस्तानकडून वसीम अक्रम, वकार युनिस, रमीझ राजा आणि बाजीद खान यांचा समालोचकांच्या यादीत समावेश आहे.

बांगलादेशचे अथर अली आणि श्रीलंकेचे रसेल अर्नोल्ड देखील समालोचन करताना दिसतील. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस याचं देखील समालोचकांच्या यादीत नाव आहे. हे सर्व दिग्गज लाईव्ह सामन्यात आपल्या एक्सपर्ट कमेंटने चार चांद लावणार आहेत.

एशिया कप 2023 वेळापत्रक

30 ऑगस्ट - पाकिस्तान vs नेपाल, मुल्तान, पाकिस्तान

31 ऑगस्ट - बांग्लादेश vs श्रीलंका, कँडी, श्रीलंका

2 सप्टेंबर - पाकिस्तान vs भारत, कँडी, श्रीलंका

3 सप्टेंबर बांग्लादेश vs अफगानिस्तान, लाहोर, पाकिस्तान

4 सप्टेंबर, भारत vs नेपाल, कँडी, श्रीलंका

5 सप्टेंबर, अफगानिस्तान vs श्रीलंका, लाहोर,पाकिस्तान

सुपर 4 शेड्यूल

6 सप्टेंबर, A1 vs B2, लाहोर, पाकिस्तान

9 सप्टेंबर, B1 vs B2, कोलंबो श्रीलंका

10 सप्टेंबर, A1 vs A2, कोलंबो श्रीलंका

12 सितंबर, A2 vs B1 कोलंबो श्रीलंका

14 सप्टेंबर, A1 vs B1, कोलंबो श्रीलंका

15 सप्टेंबर, A2 vs B2, कोलंबो श्रीलंका

17 सप्टेंबर, फायलन, कोलंबो श्रीलंका

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT