Asia Cup 2023 Gautam Gambhir shows the middle finger to fans chanting Kohli 
क्रीडा

Gautam Gambhir Video : कोहलीचे नाव घेताच गौतम गंभीर संतापला! प्रेक्षकांकडे पाहून केली अश्लील कृती

Kiran Mahanavar

Gautam Gambhir Video : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि नेपाळचा संघ पल्लेकेलेच्या मैदानावर आमनेसामने आले आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर देखील स्टार स्पोर्टकडून कॉमेंट्री करत आहे. सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पाहिला मिळाली. जेव्हा गंभीर मैदानातून कॉमेंट्री रूमकडे जात होता, त्यावेळी त्याला पाहताच प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा जयघोष सुरू केला.

सुरुवातीला गंभीर बघतच राहिला पण नंतर प्रेक्षकांकडे बोट दाखवत (अनैतिक हावभाव) पुढे गेला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात क्रिकेट चाहते गंभीरच्या कृत्याचा निषेध करताना दिसत आहेत.

आयपीएल 2023 मध्ये या दोघांमध्ये भांडण झाले होते जे खूपच वाढले होते. गंभीर हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. या सामन्यात लखनौच्या फलंदाजीदरम्यान नवीन उल हक आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर जरा जास्त झाली त्यावेळी भांडणात गंभीरने पुन्हा हस्तक्षेप केला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

याआधी 2013 मध्ये जेव्हा कोहली बंगळुरूचा कर्णधार होता आणि गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. तेव्हा खेळल्या गेलेल्या सामन्यात या दोघांमध्ये भांडण झाली होती.

पण आता सोशल मीडियावर दोघांचे चाहते एकमेकांना ट्रोल करत आहेत. गंभीर हा असा व्यक्ती आहे जो कोहलीबद्दल सतत काही ना काही बोलत असतो. कोहली आशिया कप-2023 च्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्याला केवळ चार धावा करता आल्या होत्या. यानंतर गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना कोहलीवर टीका केली आणि त्याच्या शॉट्सच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT