Nepal squad for Asia Cup 2023 
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया कपसाठी संघाची घोषणा! रोहित कर्णधार तर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या खेळाडूंची एन्ट्री

Kiran Mahanavar

Nepal squad for Asia Cup 2023 : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप स्पर्धेच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. ही स्पर्धा यावेळी हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवली जाणार आहे. आता नेपाळनेही आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

या संघात माजी कर्णधार संदीप लामिछानेलाही स्थान मिळाले आहे. या स्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचा आरोप असून त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र सध्या संदीप जामिनावर बाहेर आहे. न्यायालयातही खटला सुरू आहे. दरम्यान, संदीपही आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशनेही आपले संघ जाहीर केले आहेत. भारतीय संघाचीही लवकरच घोषणा केली जाणार आहे. आशिया कपमध्ये फायनलसह एकूण 13 सामने होणार आहेत. याअंतर्गत यजमान पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने होतील, तर अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे होणार आहे. तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप 2023 साठी नेपाळ संघाचे कर्णधारपद रोहित पौडेलकडे देण्यात आले आहे. संदीप फक्त गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

आशिया कप स्पर्धेतील दोन गट पुढीलप्रमाणे

  • गट-अ : भारत, पाकिस्तान आणि नेपाळ.

  • गट-ब : श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान

22 वर्षीय अनुभवी फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने नेपाळच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

त्यावर संदीपलाही अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संदीपची जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत संदीप पुन्हा नेपाळ संघासोबत खेळत आहे. मात्र या आरोपांमुळे त्याचे कर्णधारपद गेले.

आशिया कप 2023 साठी नेपाळ संघ (Nepal squad for Asia Cup 2023) - रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख, ललित राजबंशी, भीम शार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, किशोर महतो, संदीप झोरा अर्जुन सौद आणि श्याम ढकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT