India vs Nepal Asia Cup 
क्रीडा

India vs Nepal Asia Cup: सामना न खेळता टीम इंडिया सुपर-4 मध्ये? कँडीतून मिळाले संकेत, जाणून घ्या गणित

Kiran Mahanavar

India vs Nepal Asia Cup : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते, पण ज्याची भीती होती तेच झाले. सुदैवाने सामना सुरू झाला आणि पावसामुळे अडथळा ही आला पण भारताचा डाव कसातरी पूर्ण झाला.

मात्र त्यानंतर पाऊस इतका पडला की भारतासह पाकिस्तानच्याही विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. आता भारताला 4 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी नेपाळशी कँडीमध्ये सामना करायचा आहे. कॅंडीमध्ये हवामानमुळे टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा होईल का, हे भारतीय चाहत्यांनाही जाणून घ्यायचे आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण शेअर करावा लागला. यानंतर पाकिस्तान सुपर-4 मध्ये पात्र ठरला. आता सुपर-4 चे तिकीट मिळवण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे.

पण, भारत-नेपाळ सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे. असे झाले तरी टीम इंडिया सुपर-4 मध्ये पोहोचेल आणि नेपाळ स्पर्धेतून बाहेर पडेल.

वास्तविक, नेपाळ पहिला सामना पाकिस्तानकडून हरला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना रद्द झाल्यामुळे एक गुण मिळाला. जर नेपाळविरुद्धचा सामना रद्द झाला तर भारताला 1 गुण मिळेल आणि नेपाळलाही तेवढेच गुण मिळतील. म्हणजेच टीम इंडियाचे 2 गुण होतील आणि भारत हा सामना सामना न खेळता सुपर-4 मध्ये पोहोचेल.

Accuweather च्या अहवालानुसार, सोमवारीही कॅंडीमध्ये 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅंडीमध्ये सकाळीही पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. दुपारी 1 ते 7 या वेळेत कॅंडीमध्ये पावसाची शक्यता 65 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. असे झाल्यास भारताला हा सामना न जिंकता सुपर-4चे तिकीट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT