Asia Cup 2023 Team India Prize Money sakal
क्रीडा

Team India Prize Money : आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत कुलदीप यादवही झाला मालामाल! रक्कम ऐकून व्हाल थक्क

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Team India Prize Money : आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.

चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियासोबत कुलदीप यादवही मालामाल झाला आहे. भारतीय संघाला अंदाजे 1.24 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच वेळी, उपविजेत्या श्रीलंकेला देखील अंदाजे 62 लाख रुपये मिळाले आहेत.

आशिया कप 2023 मध्ये कोणाला किती बक्षीस मिळाले ते जाणून घेऊया...

  • रवींद्र जडेजा : $3000 (2.49 लाख) सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द मॅच

  • मोहम्मद सिराज : $5000 (रु. 4.15 लाख) आणि ट्रॉफी, सामनावीर

  • कुलदीप यादव : $50,000, (रु. 41.54 लाख) टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू (कुलदीपने या स्पर्धेत एकूण नऊ विकेट घेतल्या, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या पाच विकेट्सचा समावेश आहे)

  • श्रीलंकन ​​ग्राउंड स्टाफ : पिच क्युरेटर आणि ग्राउंड्समनला $50,000 (रु. 41.54 लाख) बक्षीस

  • श्रीलंका : उपविजेत्या संघाला $75,000 (रु. 62.31 लाख)

  • भारत : विजेत्या संघाला $150,000 (रु. 1.24 कोटी).

सामन्याबद्दल बोलायच झाल तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण बुमराहने पहिल्याच षटकात विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. सिराजने श्रीलंकेच्या डावातील चौथ्या षटकात चार विकेट घेत संपूर्ण लंकेच्या संघाचे कबरडे मोडले .

सिराजने त्याच्या पुढच्याच षटकात पाच बळी पूर्ण केले. हार्दिकने तीन बळी घेतले आणि सिराजला आणखी एक यश मिळाले. कुसल मेंडिसच्या 17 धावा आणि दासून हेमंताच्या 13 धावांमुळे श्रीलंकेचा संघ 50 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 37 चेंडूत लक्ष्य गाठले. शुभमन गिल 27 आणि इशान किशन 23 धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना 263 चेंडू शिल्लक असताना 10 गडी राखून जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT