बॉक्सिंग  sakal
क्रीडा

भारताच्या लवलिना, हुसामुद्दीनचे पदक पक्के

आशियाई एलीट बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

अम्मान (जॉर्डन) : भारतीय खेळाडूंची आशियाई एलिट बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी रविवारीही कायम राहिली. पुरुषांच्या गटात मोहम्मद हुसामुद्दीन याने उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतांसाठी पदक पक्के केले. त्याआधी शनिवारी लवलिना बोर्गोहेन हिनेही महिला गटात अंतिम चारमध्ये धडक मारत पदक पक्के निश्‍चित केले होते.

दोन वेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या हुसामुद्दीनने हेंगसेओक ली याचा ५७ किलो वजनी गटात ५-० असा सहज पराभव केला. हेंगसेओकने सुरुवातीपासूनच हुसामुद्दीनवर जोरदार ठोसे लगावत दबाव टाकण्यास सुरुवात केली होती; मात्र आपला अनुभव पणास लावून हुसामुद्दीनने पुनरागमन करत सामना ५-० असा कतर्फी जिंकला. हुसामुद्दीनचा उपांत्य फेरीचा सामना कझाकस्थानच्या सेरिक तेमिरझाशी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. पुरुषांच्या ५४ किलो वजनी गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अनंता चोपडेला किर्गिझस्तानच्या सेदेकमाटोव्ह सांझाईकडून ०-४ असे पराभूत व्हावे लागले.

महिला गटातही आगेकूच

भारतीय खेळाडूंनी महिला गटातही दमदार कामगिरी केली. अनिकुशिता बोरो हिने ५६ किलो वजनी गटात आणि लवलिना बोर्गोहेन हिने ७५ किलो वजनी गटात आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अनिकुशिताने जपानच्या त्सुबाटा अरिसा हिचा पराभव केला; तर बार्गोहेनने कझाकस्तानच्या व्हॅलेंटिना खल्झोवाचा ३-२ असा विभाजित निकालाने पराभव केला.

पुरुष गटात पाच खेळाडूंचा कस लागणार

भारतातर्फे (सोमवारी) नरेंदर ( +९२ किलो), नवीन कुमार (९२ किलो), लक्ष चहर (८० किलो), सुमित (७५ किलो) आणि सचिन (७१ किलो) आपापल्या गटात हे आपले नशीब आजमावणार आहेत. या खेळाडूंकडून पदकाच्या आशा आहेत. या आशियाई स्पर्धेत २७ देशांमधून २६७ बॉक्सर सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar समोर मोठं आव्हान; टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलशी होणार सामना, जाणून घ्या ही मॅच कधी व केव्हा रंगणार

PM Kisan 22nd Installmen : नवीन वर्षात 'या' महिन्यात मिळणार पीएम किसानचा २२ वा हप्ता, 'असं' चेक करा तुमचं स्टेटस

Latest Marathi News Live Update : नांदेड महापालिकेत भाजप-आरपीआयची युती तुटली

Shocking Crime Incident : शेजाऱ्याचे आईसोबत संबंध, नंतर मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न; पण तरुणीने जे केलं ते भयानक...

MOVIE REVIEW: पटापट दाखवण्याच्या नादात हरवलं भावनांचं कनेक्शन; 'क्रांतीज्योती विद्यालय'चे सचिन खेडेकर एकमेव तारणहार

SCROLL FOR NEXT