Aus vs Sa ODI sakal
क्रीडा

Aus vs Sa ODI :ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेत रचला इतिहास! वॉर्नर अन् हेड यांनी तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

Kiran Mahanavar

Australia vs South Africa ODI : ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. कांगारू संघाने शनिवारी (9 सप्टेंबर) ब्लोमफॉन्टेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या 10 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यात 10 षटकांत 100 धावा करणारा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने 10 षटकात एकही बिनबाद 102 धावा केल्या. यादरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि हेडने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी कागिसो रबाडा, मार्को जॅनसेन आणि अॅनरिक नॉर्टजे यांसारख्या गोलंदाजांना झोडपून काढले.

ट्रॅव्हिस हेड 12व्या षटकात बाद झाला. त्याने 36 चेंडूत 64 धावा केल्या. यादरम्यान त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार मारले.

या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावले. त्याने 93 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि तीन षटकार मारले. वॉर्नरने मार्नस लॅबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे त्याचे पाचवे शतक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT