Australia World Cup Semi final Pat Cummins Esakal
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये संघ निवडण्याची 'डोकेदुखी' ताकद दर्शवणारी

Depicting the 'headache' of team selection in the semi-finals of the World Cup

सकाळ ऑनलाईन टीम

Australia World Cup Semi final Pat Cummins :

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या उपांत्या सामन्यासाठी कोणाला अंतिम संघात स्थान द्यायचे, ही डोकेदुखी आमची ताकद दाखवणारी असेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने सांगितले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शने नाबाद १७७ धावांची खेळी करून त्याने कमिंस आणि संघ व्यवस्थापनाची 'डोकेदुखी' वाढवली आहे.

सलग दोन पराभवाने सुरू झालेली ऑस्ट्रेलियाची मोहीम साखळी सामन्यांत सात विजयाने पूर्ण झाली. त्यांचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकतामध्ये होणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलने मुंबई अफगाणिस्तानविरुद्ध अविस्मरणीय नाबाद २०१ धावांची खेळी साकार केली. त्यानंतर शनिवारी मार्शने १३२ चेंडूत नाबाद १७७ धावा झळकावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आता मधल्या फळीसाठी अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. संघातील सर्व १५ खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ईडन गार्डनवरील परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही संघ निवड करू असे कमिंसने सांगितले.

सलग सात सामने जिंकणे, हे आमच्यासाठी खासच होते; तसेच तीनशे धावांपर्यंतच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते, असे कमिंस म्हणाला.

गोलंदाजीत माझ्याकडून भरपूर धावा देण्यात आल्या होत्या, तरीही मला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले याचे आश्चर्य वाटत आहे. चार षटकांत जवळपास ५० धावा मी दिल्या होत्या होत्या; परंतु याची भरपाई मी फलंदाजीत केली, याचा आनंद आहे, असे मार्शने सांगितले, गेल्या आठवड्यात माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यासाठी मायदेशी गेलो होतो. आता माझी आक्रमक शतकी खेळी पाहून आई आणि वडिलांना निश्चितच आनंद झाला असेल, असेही मार्श म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT