Stuart MacGill Google
क्रीडा

माजी क्रिकेटरचे अपहरण करणारे चौघं जेरबंद

स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, अपहरणकर्त्यांनी मारहाण करुन त्यांना सोडून दिले.

सकाळ डिजिटल टीम

Former Cricketer Kidnapped News : ऑस्ट्रेलियाचे माजी टेस्ट क्रिकेटर स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) यांना सिडनीतील त्यांच्या घरातून अपहरण (Kidnapped) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, अपहरणकर्त्यांनी मारहाण करुन त्यांना सोडून दिले. एका महिन्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. न्यू साउथ (New South Wales in Australian State) वेल्स पोलिसांनी 14 एप्रिल रोजी अपहरण करण्यात आलेल्या व्यक्ती 50 वर्षीय असल्याचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि न्यूज कॉर्प आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अपहरणकर्त्या पीडिताचे ओळख मॅकगिल (Stuart MacGill) असल्याचे समोर येत आहे.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सिडनीतील उत्तरी भागात एका व्यक्तीने स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) यांचा रस्ता अडवला. या व्यक्तीने बळजबरीने माजी क्रिकेटरला कारमध्ये बसवून अपहरण केले. मॅकगिल (Stuart MacGill) यांना सिडनीतील दक्षिण-पश्चिम परिसरात नेण्यात आले. याठिकाणी त्यांना मारहाण करुन त्यांना सोडण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पोलिसांनी चौघांना केली अटक

पोलिसांनी अधिकृतपणे दिलेल्या निवेदनानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाने संबंधित प्रकरणात चौघांना अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून हे संशयीत आरोपी अनुक्रमे 27, 29, 42 आणि 46 वर्षांचे आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्यांची रवानगी स्थानिक पोलिस स्थानकात करण्यात आली असून त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहेय

ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू (Australian Former Cricketer ) मॅकगिल (Stuart MacGill) यांनी ऑस्ट्रेलियाकडून 1988 ते 2008 दरम्यान 44 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांच्या नावे 208 विकेट जमा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT