Matt dawson sacrifices finger for Olympic sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : जिद्दीला सलाम! ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:चं बोट कापलं, धक्कादायक कारण आले समोर

Matt dawson sacrifices finger for Olympic : खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करते,

Kiran Mahanavar

Matt dawson sacrifices finger for Olympic : खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करते, आणि यावेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी संघाचा खेळाडू मॅट डॉसनने असेच काहीसे केले आहे. खेळांच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्याने स्वत:चं बोट कापलं.

ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाचा 30 वर्षीय खेळाडू मॅट डॉसन तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण मॅटला अलीकडेच उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्या सर्वांनी त्याला सांगितले की ते बरे होण्यासाठी सुमारे 2 आठवडे लागतील. त्यामुळे डॉसनला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणे कठीण वाटत होते.

पण मॅटला तिसरे ऑलिम्पिक खेळायचे होते आणि त्यानंतर त्याने जे केले ते आश्चर्यकारक होते. डॉक्टरांनी त्याला दोन पर्याय दिले एक म्हणजे ऑलिम्पिक खेळू नका, दुखापत बरी होऊ द्या किंवा तुमच बोट कापून टाका. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे मॅटने बोट कापण्याचा निर्णय घेतला.

फ्रान्सला जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चॅनल सेव्हनशी बोलताना तो म्हणाला, "मी सर्जनशी बोलून हा निर्णय घेतला आहे. हे फक्त पॅरिस ऑलिम्पिकसाठी नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी आहे. हे माझ्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT