Sumit Nagal Australian Open 2024  esakal
क्रीडा

Australian Open 2024 : सुमित नागल चार सेट पर्यंत झुंजला; पराभवानंतरही जिंकले मन

अनिरुद्ध संकपाळ

Sumit Nagal Australian Open 2024 : ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सुमित नागलचा अखेर दुसऱ्या फेरीत प्रवास थांबला. त्याचा शँगने 6-2, 3-6, 5-7, 4-6 असा पराभव केला. जरी सुमित पराभूत झाला असला तरी त्याच्या झुंजारवृत्तीची चाहते कौतुक करत आहेत.

सुमितने शँगविरूद्ध आपला पहिला सेट दिमाखात जिंकला होता. सुमितने पहिलाच सेट हा 6-2 असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील सुमित दमदार कामगिरी करेल असे वाटते होते. मात्र दुसरा सेट शँगने 3 - 6 असा खिशात टाकला. सुमितने दुसरा सेट आणि सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी देखील गमावली.

तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सुमितने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र त्याचा 5 - 7 असा पराभव झाला. दोन सेट जिंकून आघाडी घेतलेल्या शँगने अखेर सुमितची झुंज चौथ्या सेटमध्ये पूर्णपणे संपवली. त्याने चौथा सेट 4 - 6 असा जिंकला. याचबरोबर सुमितचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील स्वप्नवत प्रवास दुसऱ्या फेरीत थांबला.

सुमित नागलने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आक्रमक खेळ दाखवत पात्रता फेरी पार केली होती. त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये त्याने जागतिक क्रमवारीत 31 व्या क्रमांकावर असणाऱ्या अलेक्झांडर बुबल्किचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

नागल जर ऑस्ट्रेलियन ओपनमधून दुसऱ्याच फेरीत बाहेर पडला असला तरी त्याने आक्रमक खेळ दाखवला. त्याने आपल्या उत्कृष्ठ खेळाने त्याचं भविष्य उज्वल असल्याचे संकेत दिले. नागलने पुन्हा एकदा तो मोठ्या स्पर्धेत देखील चांगल्या पद्धतीने खेळू शकतो हे दाखवून दिलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT