Babar Azam Pakistan Vs New Zealand 1st Test
Babar Azam Pakistan Vs New Zealand 1st Test esakal
क्रीडा

Babar Azam PAK vs NZ : बाबर आझमने कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Pakistan Vs New Zealand 1st Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून कराची येथे सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रमथ फलंदाजी करत दिवस अखेर 5 बाद 317 धावा ठोकल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाबाद 161 धावांची दीडशतकी खेळी केली तर सर्फराज अहमदने 86 धावांचे योगदान दिले. बाबर आझमने नाबाद दीडशतकी खेळी बरोबरच एक विक्रम देखील आपल्या नावावर केला.

बाबर आझमने पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफचे 2006 मध्ये केलेले रेकॉर्ड आजच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच तोडले. आता बाबर आझम पाकिस्तानचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मोहम्मद युसूफचे एका कॅलेंडर वर्षात 2435 धावा केल्या होत्या. आज बाबर आझमने 13 धावा करताच हे रेकॉर्ड तुटले.

(Sports Latest News)

तसे पहायला गेले तर आंतरराष्ट्रीय एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम हा श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये एका वर्षात 2868 धावा ठोकल्या होत्या. या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आहे. त्याने 2005 मध्ये 2833 धावा केल्या होत्या. तर भारताचा विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2017 मध्ये 2818 धावा ठोकल्या होत्या.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद जवळपास 4 वर्षानंतर संघात पुनरागमन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT