Babar Azam esakal
क्रीडा

Babar Azam : चार फुटावरूनही बाबरचा नाही लागला नेम, वॉर्नर तर... Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam AUS vs PAK 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 346 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 211 चेंडूत 164 धावा केल्या. त्याने ही खेळी 16 चौकार आणि 4 षटकारांनी सजवली. वॉर्नरच्या या दीडशतकी खेळीला बाबर आझमनेही एकप्रकाचे हातभार लावला.

पर्थ कसोटीत जरी डेव्हिड वॉर्नरने 164 धावांची दमदार खेळी केली असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय हे त्याला जात नाही. त्याच्या या खेळीला बाबर आझमने दिलेल्या जीवनदानाचा देखील हातभार लागला आहे. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बाबर आझमचा थ्रो चुकला अन् डेव्हिड वॉर्नरला अडचणीत आणायची पाकिस्तानची संधी हुकली.

बाबर आझमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सलमानच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर फसला. तो स्टेप आऊट होऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र चेंडू स्पिन झाला अन् विकेटकिपरच्या ग्लोव्ह्जला लागून बाबर आझमकडे गेला.

डेव्हिड वॉर्नर क्रिजच्या बाहेर असल्याने त्याला धावबाद करण्याची संधी होती. मात्र बाबर आझमला चार फुटावरून देखील चेंडू स्टम्पला मारता आला नाही. डेव्हिड वॉर्नर त्यावेळी 141 धावांवर खेळत होता. जर बाबर आझमचा थ्रो स्टम्पला लागला असता तर कदाचित वॉर्नरचे दीडशतक पूर्ण झाले नसते.

डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. आपल्या कसोटी क्रिकेटच्या शेवटच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात वॉर्नरने दीडशतकी धमाका केला. ऑस्ट्रेलियात पाकिस्तानविरूद्ध खेळताना डेव्हिड वॉर्नर कायमच मोठ्या खेळी करतो. यावेळी देखील तो मोठा धमाका करून शेवटची मालिका स्मरणीय करण्यासाठी आतुर असेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT