Badminton Lakshya Sen
Badminton Lakshya Sen Sakal
क्रीडा

India Open 2022 : लाजवाब लक्ष्य! वर्ल्ड विजेत्याला नमवून बनला चॅम्पियन!

सुशांत जाधव

भारताचा उगवता सितारा लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने इंडिया ओपन बॅडमिंटन (Badminton India Open 2022) स्पर्धेच्या एकेरीत फायनल बाजीही मारलीये. या विजयासह त्याने स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला आहे. 20 वर्षीय लक्ष्य सेन याने विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन येव याला सरळ सेटमध्ये पराभूत करत जेतेपदम पटकावले. इंडिया ओपन स्पर्धेतील त्याचे हे पहिले वहिले आणि अविस्मरणयी जेतेपद ठरले.

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलेल्या लक्ष्यनं पहिल्यांदाच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर 500 इवेंटमधील फायनल जिंकली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित लक्ष्यनं सुरुवातीपासूनचा आपला दमदार खेळ अधिकाधिक उत्तम करत स्पर्धा गाजवली. अंतिम लढतीत सिंगापुरच्या लोह कीन याला त्याने 24-22, 21-17 अशी एकतर्फी मात दिली.

बॅडमिंटन जगतात 17 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यनं सेमी फायनलमध्ये लक्षवेधी खेळ करुन दाखवला होता. या लढतीमध्ये पहिला सेट 19-21 गमावल्यानंतर त्याने दमदार कमबॅक केले आणि सामना जिंकून फायनल गाठली होती. या स्पर्धेतील महिला एकेरीत थायलंडच्या बुसानन ओंग्बारुंगफान हिने आपल्याच राष्ट्राच्या सुपानिदा कातेथोंग हिला पराभूत करत जेतेपद पटकावले.

पुरुष दुहेरीत भारतीय बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकिरेड्डी जोडीनं India Open 2022 जेतेपद पटकावले होते. या दोघांनी जोडीनं पुरुष दुहेरीत तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन्सला पराभवाचा दणका देत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुसऱ्या मानांकित जोडीने अव्वल मानांकित मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेतियावान जोडीला 21-16, 26-24 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT