top10 news esakal
क्रीडा

Sports News on 14th October 2024: वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी भारताला हवी पाकिस्तानची मदत ते मुंबईचा बडोद्याविरूद्ध २६ वर्षांनी पराभव

Sports News on 14th October 2024: १४ ऑक्टोबर रोजी क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बडोद्याविरूद्धचा पहिला सामना मुंबईने गमवावा लागला आहे. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भारतचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीमध्ये जाण्याचे समीकरण पाकिस्तान संघावर अवलंबून आहे. अभिमन्यू ईश्वरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग चौथे शतक झळकावले. तर, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्या अपयशी ठरला...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Mumbai vs Baroda: गतविजेत्या मुंबई संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बडोद्याविरूद्धचा पहिला सामना गमवावा लागला आहे. दुसऱ्या डावात मुंबई संघ पुनरागम करत आहे असं वाटत असताना, मुंबईचे फलंदाज सोपे लक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरले. बडोदा संघाने हा सामना ८४ धावांनी जिंकला. तब्बल २६ वर्षांनी बडोद्याने मुंबईविरूद्ध हा विजय मिळवला.सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Swapnil Kusale: पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला २ कोटी रूपये बक्षीस देऊन महाराष्ट्र सरकारने सन्मानित केले. परंतु स्वप्नीलच्या वडीलांनी त्याला ५ कोटी रूपये आणि पुण्यात घर देण्याची मागणी सरकारकडे केली होती. राज्य सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण न केल्यामुळे स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे सरकारवर नाराज आहेत.सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Maharashtra vs Jammu and Kashmir: रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील महाराष्ट्राचा जम्मू-काश्मीविरूद्धचा पहिला सामना अनिर्णित राहिला. पण, जम्मू-काश्मीरने सामन्यात वर्चस्व दाखवत तीन गुण मिळवले. तर, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले.सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT