BCCI
BCCI  esakal
क्रीडा

BCCI Meeting : IPL शेड्यूलसह हे 10 विषय असतील पटलावर

सुशांत जाधव

BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2022 हंगामासाठीची तयारी केली आहे. यासंदर्भात बोर्डाने एपेक्स काउंसिल मीटिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मार्चला ही बैठक नियोजित असून IPL शेड्यूलसह 10 मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

बीसीसीआयच्या BCCI निवेदनानुसार, 11 वी एपेक्स काउंसिल मीटिंग 2 मार्चला व्हिडिओ कॉन्फ्ररन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या बैठकीत 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या (ODI World Cup) पार्श्वभूमीवर लोकल ऑर्गेनायजिंग कमिटी (LOC) ची स्थापना करण्याचा विचार करण्यात येईल. या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. याशिवाय अंडर-25 क्रिकेटर्ससाठी सीके नायडू आणि सीनियर महिला क्रिकेटर्ससाठी टी20 स्पर्धेसंदर्भात चर्चा होईल.

आयपीएल शेड्यूलवर चर्चा अपेक्षित

ही बैठक आयपीएलच्या आगामी हंगामाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीनंतर आयपीएलचे शेड्युल पक्के होण्याची दाट शक्यता आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आगामी हंगामात दिसणार असून साखळी फेरीतील सामने मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. प्लेऑफच्या लढती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर यासंदर्भातील चर्चेला पूर्णविराम लागेल.

बीसीसीआयच्या बैठकीत या 10 मुद्यांवर असेल सर्वांचे लक्ष

  • लैंगिक शोषण प्रकाराला आळा घालण्यासाठीची पॉलिसी मजबूत करण्यावर भर देणं

  • पुरुष क्रिकेटर्सचे करार वाढवण्यासंदर्भातील चर्चा

  • महिला क्रिकेटर्स सेंट्रल कॉन्ट्रेक्ट वाढवण्याचाही केला जाणार विचार

  • दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौरा शेड्युल आणि ठिकाण

  • Byjus सोबतचे कॉन्ट्रेक्ट अपडेट करण्याबाबत चर्चा

  • स्टेट असोसिएशनची यजमानपदाची फी वाढवण्याबाबत विचार विनिमय

  • क्रीडा विकासासाठी जनरल मॅनेजरची नियुक्ती

  • सीके नायडू ट्रॉफी आणि सीनियर महिला टी20 लीगसंदर्भात चर्चा

  • 2023 वनडे वर्ल्ड कपसाठी लोकल ऑर्गेनायजिंग कमेटी (LOC) ची स्थापना करण्याबाबत चर्चा

  • नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) स्पोर्ट्स सायन्स हेडची नियुक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT