BCCI selectors don't want Rohit Sharma and Virat Kohli in India T20I squad sakal
क्रीडा

Virat-Rohit बाबतच्या अपडेटमुळे उडाली खळबळ! निवडकर्त्यांना दोघेही का नको आहेत संघात?

India vs Afghanistan T20 Series India Squad | अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ कधीही जाहीर केला जाऊ शकतो.

Kiran Mahanavar

Ind vs Afg T20 Series India Squad : अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ कधीही जाहीर केला जाऊ शकतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहे. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतासाठी ही शेवटची टी-20 मालिका असणार आहे.

अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी खेळाडू विराट कोहलीची संघात निवड हाही मोठा प्रश्न आहे. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, रोहित आणि विराट यांना टी-20 क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल की नाही.

दरम्यान, एका बातमीने खळबळ उडाली आहे. त्यात असे सांगण्यात येत आहे की, संघ निवडकर्त्यांना विराट आणि रोहितला टी-20 साठी संघात सामील करू इच्छित नाहीत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका वर्षाहून अधिक काळ एकही टी-20 सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत संघ निवडकर्त्यांना त्यांनी दीर्घकाळानंतर टी-20 मध्ये परतणे आणि त्यानंतर एका मालिकेनंतर थेट वर्ल्ड कपमध्ये खेळणे पसंत नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, संघ निवडकर्ते स्वतः रोहित आणि विराटला त्यांच्या संघात समाविष्ट करू इच्छित नाहीत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करून त्यांना टी-20 क्रिकेट खेळण्याबाबत प्रश्न विचारले होते. यावर या दोन्ही दिग्गजांनी अफगाणिस्तान मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले होते. मात्र आता या दोघांना संघात घेण्यास निवडकर्तेच उत्सुक नसल्याची बातमी समोर येत आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टी-20 मालिकेसाठी संघात समाविष्ट करायचे असेल तर बीसीसीआय सचिव जय शाह यांना याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असेही सांगण्यात येत आहे.

टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात स्थान दिले नाही तर बीसीसीआय सचिवांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागू शकतो, तरच हे दोन्ही खेळाडू अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. गेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित आणि विराटला टी-20 संघात ठेवण्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

SCROLL FOR NEXT