Indian Cricket Team Overhaul – India Squad SL Series sakal
क्रीडा

Team India: टी-20 मधून विराट-रोहितसह 'या' 6 खेळाडूंची कारकीर्द संपली! टीम इंडियात आता 'नो एंट्री'

बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी भारताच्या 6 वरिष्ठ खेळाडूंना आता त्यांच्या टी-20 कारकिर्दी संपवण्याचा....

Kiran Mahanavar

Indian Cricket Team Overhaul – India Squad SL Series : भारतीय संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील बरखास्त केलेल्या निवड समितीने भारतीय क्रिकेटसाठी संघ निवड केली. इनसाइडस्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी भारताच्या 6 वरिष्ठ खेळाडूंना आता त्यांच्या टी-20 कारकिर्दी संपवण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, या 6 क्रिकेटपटूंमध्ये रोहित, शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, आर.अश्विन, मोहम्मद शमी आणि दिनेश कार्तिक यांच्या नावांचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या प्रमुख सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, आता आम्ही 2024 च्या टी-20 विश्वचषकाची योजना आखत आहोत. आमचे अनेक खेळाडू 35-36 वर्षांचे आहेत. अशा प्रकारे ते संघाच्या दीर्घकालीन योजनेत बसत नाही. आतापासूनच आपली टीम तयार करायची आहे. कारण आता नाही तर कधी नाही. अशा परिस्थितीत आम्ही कठोर निर्णय घेतले आहेत. अशा खेळाडूंना कळवले आहे जे आता वयाच्या धर्तीवर टी-20 संघात बसत नाहीत.

ज्या खेळाडूंची टी-20 कारकीर्द संपण्याच्या दिशेने चालले आहे, त्यात अश्विन, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व पूर्णपणे स्थानाबाहेर आहेत. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली हे प्लॅनमध्ये असतील पण त्यांच्यासाठी कमी संधी असतील. संघ आता त्यांच्या पुढे विचार करत असल्याची माहितीही बीसीसीआयने दिली आहे.

केएल राहुललाही स्पष्टपणे सांगण्यात आले की, तो टी-20 संघाच्या प्लॅनमध्ये बसत नाही. ऋषभ पंतची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड झाली नाही, मात्र तो टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या योजनेचा एक भाग असू शकतो.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या टीम इंडियामध्ये उद्याची झलक पाहायला मिळाली. निवडकर्त्यांनी काही मोठे बदल केले आहेत. अनेक खेळाडूंना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. म्हणजेच पुढच्या टी-20 विश्वचषकासाठी टीम मेकिंग सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT