BCCI Title Sponsorship esakal
क्रीडा

BCCI Title Sponsorship : बीसीसीआयनं पैशाचा तोरा कमी करत टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर काढलं खरं मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Title Sponsorship : बीसीसीआय अधिकाऱ्यांसाठी सध्याचा काळ खूप धावपळीचा सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्डकप असून त्याची सर्व तयारी करायची आहे. याच काळात मीडिया स्पॉन्सर आणि टायटल स्पॉन्सरही शोधायचा आहे. बीसीसीआयने आज टायटल स्पॉन्सरशिपसाठी निविदा काढल्या आहेत.

बीसीसीआय आणि मास्टर कार्डचा करार हा सप्टेंबर महिन्यात संपतो आहे. दरम्यान मायदेशात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका देखील होणार आहे.

त्यापूर्वी बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर्स शोधायचे आहेत. मास्टर कार्डच्या कराराअंतर्गत देवधर ट्रॉफी ही स्पॉन्सर्स म्हणून मास्टर कार्डची शेवटची स्पर्धा असणार आहे. मास्टर कार्डने पेटीएमकडून ही टायटल स्पॉन्सरशिप टेक ऑव्हर केली होती. (BCCI Title Sponsor Tender News)

बीसीसीआयने टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर खरेदी करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट ठेवली आहे. टायटल स्पॉन्सर निवडण्याची संपूर्ण प्रक्रिया ही 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका ही 22 सप्टेंबरपासून सुरू होईल.

गेल्या सप्टेंबर महिन्यात मास्टर कार्डने पेटीएमकडून टीम इंडियाचे टायटल स्पॉन्सरशिप टेक ओव्हर केली होती. ही डील उर्वरित काळासाठी होती. पेटीएमने 2015 मध्ये यासाठी प्रती सामना 2.4 कोटी रूपये मोजले होते. हा करार 2019 मध्ये पुन्हा वाढवण्यात आला.

त्यावेळी प्रती सामन्यासाठी 3.8 कोटींचा करार झाला होता. मात्र गेल्या सप्टेंबरमध्ये पेटीएम या करारातून बाहेर पडले. बीसीसीआयने यानंतर मास्टर कार्डसोबत एका वर्षाचा करार केला.

बीसीसीआय टायटल स्पॉन्सरसाठी खूप शोधाशोध करत आहे. मात्र सर्व मोठ्या कंपन्या या आयपीएलमध्ये जास्त रस दाखवत आहेत. कंपन्यांनी कमी रस दाखवल्याने बीसीसीआयला आपली प्रती सामना किंमत ही 3 कोटींपर्यंत कमी केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Women Doctor : बहिणीसाठी शिक्षण सोडलं, वडिलांसोबत शेती करायचा भाऊ; कर्ज काढून MBBS केलं, एक महिन्यानंतर तिचा...

Laptop Repair Tips: लॅपटॉप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आजपासूनच 'या' 10 चुका करणे टाळा

Latest Marathi News Live Update : चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

Viral News : कामगाराने केला १.२४ कोटींच्या बांगड्यांचा चुराडा, पण त्यानंतर मालकाने जे केले ते वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sangli Crime : सांगलीत खळबळ! ‘कृषी’ विभागातील शिपायावर तलवार हल्ला; गळ्याला फास लावला अन्

SCROLL FOR NEXT