IND vs PAK Cricket match latest update in marathi  sakal
क्रीडा

IND vs PAK : पाकमध्ये न खेळण्याचे पत्र बीसीसीआयने द्यावे; पाक क्रिकेट मंडळाची मागणी

IND vs PAK Cricket match latest update in marathi : सुरक्षिततेच्या कारणावरून भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला तर त्यांना परवानगी नाकारणाऱ्या त्यांच्या केंद्र सरकारच्या लेखी पत्राचा दाखला आम्हाला द्यावा, अशी मागणी पाक क्रिकेट मंडळाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कराची : सुरक्षिततेच्या कारणावरून भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला तर त्यांना परवानगी नाकारणाऱ्या त्यांच्या केंद्र सरकारच्या लेखी पत्राचा दाखला आम्हाला द्यावा, अशी मागणी पाक क्रिकेट मंडळाने केली आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही स्पर्धा नियोजित आहे आणि आम्हाला तयारी सुरू करण्यासाठी भारतीय संघाच्या समावेशाबाबतचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असेही पाक मंडळाचे म्हणणे आहे.

येत्या १९ तारखेला कोलंबोत आयसीसीची वार्षिक परिषद होत आहे. त्यात भारताच्या समावेशाबाबत आणि भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला तर हायब्रिड मॉडेलवर चर्चा होणे अपेक्षित आहे. दोन देशात सामने खेळवावे लागले तर आयसीसीला अधिक खर्च करावा लागतो, हा मुद्दासुद्धा चर्चेत येऊ शकतो.

भारतीय संघाला पाकमध्ये खेळण्यास त्यांचे सरकार परवानगी देत नसेल तर तसे पत्र आम्हाला किंवा आयसीसी दाखला म्हणून सादर करण्यात यावे. हा नवा मुद्दा पाक मंडळाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सुरक्षिततेच्या कारणावरून आपला संघ पाकमध्ये पाठवण्यास केंद्र सरकार तयार नाही, म्हणूनच २०२३ मध्ये झालेल्या आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. परिणामी, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात आली. अंतिम सामन्यासह भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांची तयारी अगोदरच सुरू केली आहे. भारत-पाक ही साखळी लढत त्यांनी १ मार्च रोजी नियोजित केली आहे. सुरक्षिततेची अधिक हमी देण्यासाठी त्यांनी भारताच्या सर्व साखळी लढती एकाच शहरात म्हणजे लाहोरमध्ये नियोजित केल्या आहेत. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च असा स्पर्धेचा कालावधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT