Bengal Sports Minister Manoj Tiwary Playing in Ranji Trophy Match aas86  esakal
क्रीडा

रणजी ट्रॉफीत 'क्रीडा मंत्री' खेळतोय सामना

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात एका राज्याचा मंत्री सामना खेळत आहे. क्रिकेट राजे रजावाडे यांचा खेळ म्हणून ओळखला जात होता. मात्र स्वातंत्र्यानंतर त्याची परिभाषा बदलली. क्रिकेट सामन्यांच्या आवाक्यात आला. कालांतराने क्रिकेट वर्तुळात राजकारणी आणि राजकारण दोन्ही अवतरलं. मात्र राजकराणी हे संघटनेपुरते मर्यादित होते. ही परंपरा पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री (Bengal Sports Minister) मनोज तिवारीने (Manoj Tiwary) मोडली. क्रिकेटपटू ते मंत्री असा प्रवास केलेल्या मनोज तिवारीने मंत्री झाल्यानंतरही क्रिकेटशी असलेली अपली नाळ तोडली नाही. तो पश्चिम बंगालकडून यंदाच्या रणजी हंगामात उतरला आहे. एखादा मंत्री खेळण्याची रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्याचीही इतिहासातील पहिलीच घटना असावी.

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला रणजी ट्रॉफीच्या हंगाम आजपासून सुरू होत आहे. हा हंगाम दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Sports Minister Manoj Tiwary) बडोदा विरूद्धच्या सामन्यात बंगालकडून खेळत आहे. मनोज तिवारी हे क्रिकेट जगतातील परिचयाचे नाव आहे. तो जवळपास गेल्या 15 वर्षापासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्यातील 125 सामन्यातील 100 सामने रणजी ट्रॉफीचे आहेत. त्याने प्रथम श्रेणीत 50.36 च्या सरासरीने 8965 धावा केल्या आहेत. ज्यात 27 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणीत 303 धावांची सर्वोच्च खेळी देखील केली आहे.

मनोज तिवारीने मंत्री झाल्यानंतर यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) देखील आपले नशीब आजमावले होते. मात्र तेथे त्याला फारसे यश आले नाही. मनोज तिवारीने काही महिन्यापूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणून लढवली होती. तो जिंकून आल्यानंतर त्याला ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT