FIFA World Cup 2022 Neymar Injury
FIFA World Cup 2022 Neymar Injury  esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 Neymar : ब्राझीलच्या कर्णधाराचा घोटा मुरगळला; नेमार 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Neymar Injury : फिफा वर्ल्डकप 2022 मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीललने आपली वर्ल्डकप मोहिम विजयाने सुरू केली. ग्रुप G च्या सामन्यात सर्बियाचा 2 - 0 असा पराभव केला. मात्र या सामन्यादम्यान, ब्राझीलचा कर्णधार नेमारला जबर दुखापत झाली आहे. त्याला पुढचे 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे असे संघाच्या डॉक्टरांनी त्याच्या दुखापतीबाबत बोलताना सांगितले. नेमारने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूसोबत टक्कर झाल्यानंतर 79 व्या मिनिटाला मैदान सोडले होते. त्याचा घोटा मुरगळला होता. नेमारची दुखापत पाहता तो फिफा वर्ल्डकपला मुकणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

नेमारच्या दुखापतीबाबत लासमार यांनी सांगितले की, 'आम्हाला नेमारच्या दुखापतीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी अजून 24 ते 48 तास लागणार आहेत. तोपर्यंत तो वैद्यकीय देखरेखीखाली असेल. आम्ही त्याचा एमआरआय करण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही. आम्ही उद्या पुन्हा त्याच्या दुखापतीबाबत तपासणी करणार आहोत.' ते पुढे म्हणाले की, 'आपल्याला अजून वाट पाहण्याची गरज आहे. आम्ही याबाबत कोणतेही मोघम वक्तव्य करणार नाही.

दरम्यान, नेमारशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र नेमारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नेमार सध्या दिग्गज पेले यांच्या ब्राझीलसाठी 77 गोल केलेल्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून दोन गोल मागे आहे. मात्र दुखापतींनी कायम ग्रासलेला नेमार मोठ्या स्पर्धेत हमाखास दुखापतग्रस्त होतो असा इतिहास आहे. नेमार 2014 मध्ये पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप खेळला. त्यावेळी त्याला कोलंबियाविरूद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात पाठीला दुखापत झाली. नेमार नसल्यामुळे सेमीफायनल सामन्यात ब्राझीलला जर्मनीकडून 7 - 1 असा अपमानजनक पराभव सहन करावा लागला होता.

यानंतर 2019 च्या कोपा अमेरिका स्पर्धेतही नेमार घोट्याचे लिगामेंट दुखावल्याने स्पर्धेतून बाहेर पडला होता. याचबरोबर नेमार 2021 मध्ये डाव्या पायाच्या घोट्याला पुन्हा दुखापत झाल्याने फ्रेंच हंगामातील 10 आठवडे मैदानापासून दूर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT