क्रीडा

रिदम सांगवानची भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी ; महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात ब्राँझपदक

रिदम हिने पॅरिस ऑलिंपिकची पात्रताही मिळवली. ऑलिंपिकसाठी भारताने १६ जणांचा कोटा मिळवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जकार्ता : रिदम सांगवान हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात ब्राँझपदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी केली. आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीत तिने पटकावलेल्या पदकाने भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली.

रिदम हिने पॅरिस ऑलिंपिकची पात्रताही मिळवली. ऑलिंपिकसाठी भारताने १६ जणांचा कोटा मिळवला आहे. याआधी टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले होते. या विक्रमाला भारतीय नेमबाजांनी मागे टाकले आहे.

रिदम सांगवान हिने आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीत तिसरे पदक पटकावले आहे. याआधी तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात तिने अर्जुन सिंग चीमाच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली. आणि आता २५ मीटर पिस्तुल प्रकारात ब्राँझपदक पटकावत भारतासाठी देदीप्यमान कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: मोठी बातमी! शिंदेंनी MIM कडे मागितला पाठिंबा; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली भूमिका

Fake Talathi Fraud : 'मी तुमच्या गावचा तलाठी' म्हणत लुटले; आळेफाटा पोलिसांनी सराईत भामट्याला ठोकल्या बेड्या!

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यात 30 हजार लाडक्या बहिणींचे पैसे बंद

Crime: गुप्तांगाला जखम, व्हिडिओ, अन्...; तरुणावर सामुहिक अत्याचार, म्हणाला- ते तिघे राक्षस होते, त्यांनी माझ्यावर...

20 World Cup पूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हुकमी एक्का असलेला पॅट कमिन्सच होणार संघाबाहेर?

SCROLL FOR NEXT