IPL Betting marathi news 
क्रीडा

IPL Betting : आयपीएल फिक्सिंगबाबत CBI चा मोठा निर्णय! पुराव्याअभावी दोन प्रकरणे बंद

सकाळ वृत्तसेवा

IPL Betting : पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटसनुसार आयपीएलमध्ये काही लोक बेटिंग करत असल्याची दोन प्रकरणे सीबीआयने पुरेशा पुराव्याऐवजी बंद केली आहेत. यासंदर्भात सीबीआयने मे २०२२ मध्ये एफआयर नोंदवला होता.

यातील पहिल्या एफआयआरमघ्ये दिलीप कुमार (दिल्ली), रोहिणी आणि गुराम वासू तसेच गुराम सतिथ (हैदराबाद) यांच्याविरुद्ध सीबीआयने पहिला एफआयआर नोंदवला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या एफआयआरमध्ये सज्जन सिंग, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा (सर्व राजस्थान) यांची नावे होती.

दोन वर्षे या प्रकरणाची चौकशी सुरू होती, परंतु सीबीआयला कोणाविरुद्धही ठोस पुरावे सापडले नाहीत त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल तयार केला आणि तो २३ डिसेंबर रोजी न्यायालयात सादर केला. त्यात आरोप, चौकशी असे सर्व मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.

हा अहवाल स्वीकारायचा की अधिक तपास करावा याबाबत सीबीआयला सूचना द्यायच्या, हे आता न्यायालयाच्या हाती आहे, असे सूत्रांनी सांगितले. आरोप करण्यात आलेल्या सर्वांचा गेल्या १० ते १३ वर्षांतील इतिहास तपासण्यात आला. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहारही पाहण्यात आले. त्यात सीबीआयला आक्षेपार्ह काही सापडले नाही, अशी माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर, इचलकरंजीत आज एकच धुमशान

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी; AQI 375 वर पोहोचला

नवऱ्याच्या अफेअरची कुणकुण; पत्नीकडून हॉटेल रूममध्ये रंगेहात पकडले गेलेले कमल हासन; अभिनेत्रीचं नाव ऐकून बसेल धक्का

Maharashtra Biodiversity : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत भर; दख्खन पठारावर प्रथमच दुर्मीळ पतंगांची नोंद, विदर्भातील संशोधकांच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT