Koneru Humpy
Koneru Humpy 
क्रीडा

ग्रँडमास्टर कोनेरू हंपीने प्रथमच पटकावले जगज्जेतेपद

रवींद्र मिराशी

मॉस्को, रशिया येथे संपन्न झालेल्या किंग सलमान जागतिक महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर कोनेरू हंपीने प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी घातली. या लढतीत कोनेरूला २४३८ फिडे रेटिंग सहित १३ वे मानांकन होते. तिने २५८३ रेटिंग तोडीच्या कामगिरीची नोंद केली. महिलांच्या एकूण १२ फेऱ्यांच्या या स्पर्धेत कोनेरूने ९ गुण (७ विजय, ४ बरोबरी आणि १ पराभव) प्राप्त करताना ४५ फिडे गुणांची देखील कमाई केली. कोनेरूला चाळीस हजार डॉलरचे बक्षीस मिळाले. युक्रेनची प्रथम मानांकित मुझीचुक अन्ना सहाव्या स्थानी राहिली. सातव्या फेरीत कोनेरूने तिला बरोबरीत रोखले. या स्पर्धेतील भारताची १६ वी मानांकित ग्रँडमास्टर द्रोणावली हरिका १३ व्या स्थानी राहिली. महिला गटात या स्पर्धेचे सरासरी रेटिंग २२४७ होते.

या लढतीत खरी रंगत भरली गेली ती ११ व्या फेरी नंतर. ११ व्या फेरी अखेर चीनची लेई टिंगजी (२४९८) ९ गुणांसहित एकटी प्रथम स्थानी होती, तर कोनेरू ८ गुणांसहित ५ व्या स्थानी होती. अंतिम फेरीत लेईला जगज्जेतेपदासाठी केवळ बरोबरी देखील चालणार होती. १२ व्या अंतिम फेरीत कोनेरूने चीनच्या ६ व्या मानांकित टॅन झोंग्यायी (२४९६) हिला पराभूत केले. त्याच वेळी लेई, तुर्कस्तानची आंतरराष्ट्रीय मास्टर अटलिक एकटेरिन (२३६०) कडून हरली. विजेती ठरविण्यासाठी स्पर्धेच्या विशेष नियमानुसार लेई व कोनेरू (टॉप दोन खेळाडू) यांच्यात दोन ब्लिट्झ डाव खेळविण्यात आले. पहिल्याच डावात कोनेरू पराभूत झाली. मात्र दुसरा डाव जिंकून कोनेरूने आपले आव्हान कायम राखले. कलाटणी देणारा हा डाव कोनेरूने जोखीम पत्करून खेळाला होता. पुन्हा सामान गुण झाल्याने 'अर्मागेडॉन' (निर्णायक) डावाचा अवलंब करण्यात आला. हा डाव जिंकून कोनेरूने महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमच जगज्जेतेपद पटकावले.

यापूर्वी कोनेरू हंपीने १०, १२ व १४ वर्षाखालील गटामध्ये विश्वविजेतेपद जिंकले आहे. सन २००२ मध्ये बुडापेस्ट (हंगेरी) येथील ग्रँडमास्टर स्पर्धेत वयाच्या १५ व्या वर्षी (१५ वर्षे १ महिना २७ दिवस) हंपीने तिसऱ्या नॉर्म सहित जगातील सर्वात तरुण वयात ग्रँडमास्टर होण्याचा ज्युदित पोल्गरचा विश्वविक्रम ३ महिन्यांच्या फरकाने मोडला होता. याच वेळी ती पुरुषांचा ग्रँडमास्टर किताब प्राप्त करणारी भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली. 

" हे माझे खुल्या गटातील पहिले जगज्जेतेपद आहे. गेली काही वर्षे चाहत्यांना माझ्याकडून क्लासिकल जगज्जेतेपदाची अपेक्षा होती. परंतु मी रौप्य पदका पर्यंतच मजल मारू शकले. या स्पर्धेत माझे १३ वे मानांकन असल्याने, माझ्याकडून कोणाला अपेक्षा नव्हत्या. पहिल्या तीन क्रमांकात बसण्याची मला आशा होती. हा निकाल माझ्या अपेक्षा बाहेरचा म्हणजे अनपेक्षित असा आहे. माझ्या घरी पोहचल्यावर हे जगज्जेतेपद मी साजरे करणार आहे. - ग्रँडमास्टर कोनेरू हंपी "

पुरुषांच्या गटात प्रथम मानांकित नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन (२८८६) याने ११.५ गुणांसहित निर्विवाद जगज्जेतेपद पटकावले. त्याने २९२० फिडे रेटिंग तोडीच्या कामगिरीची नोंद केली. कार्लसनला साठ हजार डॉलरचे बक्षीस मिळाले. आनंदच्या अनुपस्थितीत भारताच्या एकूण १२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे सरासरी रेटिंग २५३६ होते. भारतातर्फे सर्वाधिक सरस कामगिरी करणारा ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुली ९ गुणांसहित ४० व्या स्थानी राहिला. पहिल्या ३५ खेळाडूंना डॉलरच्या स्वरूपात रोख रकमेची बक्षिसे होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT