Colombia Defeat Uruguay Reach Copa America Final sakal
क्रीडा

Copa America 2024च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाशी भिडणार कोलंबिया! सेमीफायनलमध्ये उरुग्वेला केले पराभूत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत कोलंबिया संघाने उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

Kiran Mahanavar

Colombia Beats Uruguay COPA America Football : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत कोलंबिया संघाने उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यातील एकमेव गोल जेफरसन लेर्मा याने केला, ज्याने सामन्याच्या 39व्या मिनिटाला कोलंबियासाठी गोल केला.

सामन्यातील बहुतांश वेळ उरुग्वेकडे बॉल होता, मात्र त्यांना बरोबरी साधता आली नाही. आता अंतिम फेरीत कोलंबियाचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. जो रविवारी रात्री फ्लोरिडाच्या मियामी गार्डन्सवर खेळला जाईल.

कोलंबियाचा ड गटामध्ये समावेश होता. कोलंबियाने या गटामधून सात गुणांसह पहिले स्थान पटकावले व आगेकूच केली. कोलंबियाने दोन विजय व एका बरोबरीसह या गटात यश मिळवले.

कोलंबियाने कोपा अमेरिका स्पर्धा 2001 मध्ये जिंकली आहे. हे त्यांचे एकमेव अजिंक्यपद आहे. 2021मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांची नजर अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करत ट्रॉफी जिंकण्यावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT