Commentator  Sanjay Manjrekar Singing Talent
Commentator Sanjay Manjrekar Singing Talent  esakal
क्रीडा

Video: समालोचक संजय मांजरेकरांचे 'सिंगिंग टॅलेंट' होतयं व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हे गेल्या अनेक वर्षापासून समालोचन (Commentary) करत आहेत. त्यांचा समालोचनामधला हातखंडा आणि खेळाडूंवर कोणाचीही भीड न बाळगता केलेली टीका कायम चर्चेत असते. टीम इंडियातील स्टार खेळाडूंवर खोचक टिप्पणी करण्यात ते अग्रेसर असतात. मध्यंतरी त्यांच्यात आणि रविंद्र जडेजामध्ये (Ravindra Jadeja) शाब्दिक वाद रंगला होता. मात्र संजय मांजरेकर आता खेळाडूवर टीका करण्यासाठी चर्चेत आलेले नाहीत तर ते त्यांच्या सिंगिंग टॅलेंटमुळे (Singing Tanent) सध्या चर्चेत आले आहेत.

आयसीसीने महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup) दरम्यानचा कॉमेंटरी बॉक्समधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कॉमेंटरी बॉक्समध्ये निवांत बसलेल्या संजय मांजरेकरांनी एक गाणे म्हटले. हे गाणे ऐकून कॉमेंटरी बॉक्समधील महिला सहकारी भारावून गेल्या. त्यांनी टाळ्या वाजवून संजय मांजरेकर यांच्या या सिंगिंग टॅलेंटला दाद दिली.

आयसीसीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओला 'ग्रेट समालोचक, हुशार क्रिकेटर, जबरदस्त गायक संजय मांजरेकर हा अनेक हुन्नर असलेला मनुष्य आहे.

संजय मांजरेकर यांनी भारताकडून 37 कसोटी 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 37.17 च्या सरासरीने 2043 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात 33.23 च्या सरासरीने 1994 धावा केल्या आहेत. सध्या ते विविध स्पर्धांमध्ये समालोचन करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT