lawn bowls gold medal team india women team sakal
क्रीडा

CWG 2022: 'ना कोच-ना पैसे' तरीही भारताच्या या लेकींनी जिंकून दिलं गोल्ड मेडल

भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 lawn Ball Indian Women Team: राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताची प्रभावी कामगिरी कायम आहे, पहिल्या पाच दिवसात देशाने आतापर्यंत 13 पदके जिंकली आहेत. यातील सर्वात खास क्षण मंगळवारी आला, जेव्हा भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताने 17-10 ने सामना जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली, त्यांच्यासाठी हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता कारण त्यांच्याकडे कोणताही निधी किंवा प्रशिक्षक नव्हता.

भारतीय लॉन बॉल संघात (lawn Ball Indian Women Team) लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश आहे. रूपा राणी तिर्की ही संघाची कर्णधार आहे. चारही स्त्रिया वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत, प्रत्येकाची पार्श्वभूमी अगदी साधी आहे, पण हे सगळं असूनही त्यांनी इथे इतिहास घडवला.

खेळाडूंनी सांगितले की, आम्ही घेतलेली मेहनत आणि आम्ही जे विचार केला ते आम्ही साध्य केले. अनेक महिने आम्ही यासाठी दिले आहे. 2010 पासून राष्ट्रकुल खेळापर्यंतचा हा प्रवास कसा सुरू झाला यावर टीम इंडियाने सांगितले की, आम्ही वेगवेगळ्या स्तरांवर खेळत राहिलो, आम्ही अनेक पदकेही जिंकली आहेत. पण आमचं लक्ष्य राष्ट्रकुल स्पर्धेतही पदकं आणण्याचं होतं.

महिला संघातील चार सदस्यांना फार कमी लोक ओळखतात, त्यांच्यापैकी लव्हली चौबे ही झारखंडमध्ये एक पोलिस हवालदार आहे. नयनमोनी सौकिया वन विभागात काम करते, पिंकी दिल्लीतील एका शाळेत शिक्षिका आहे. तर रूपा राणी झारखंडमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT