क्रीडा

कोरोनामुळे क्रिकेटला पुन्हा ब्रेक लागणार? भारताचा आफ्रिका दौरा संकटात

जगाला लॉकडाउनचा फटका दिलेल्या कोरोनामुळे पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक लागण्याची भिती निर्माण झालीये. कोरोनाच्या संकटातून जग हळूहळू सावरत असताना दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट आढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जगाला लॉकडाउनचा फटका दिलेल्या कोरोनामुळे पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक लागण्याची भिती निर्माण झालीये. कोरोनाच्या संकटातून जग हळूहळू सावरत असताना दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट आढला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये भारतीय संघाचा नियोजित दक्षिण आफ्रिका कार्यक्रम संकटात सापडण्याची भिती निर्माण झालीये.

देशात नवा वेरिएंट आढळल्यानंतर दक्षिण अफ्रिकी सरकारने 'हाय-अलर्ट' जारी केलाय. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ब्रिटन सरकारने दक्षिण अफ्रिकेसह पाच अन्य देशातील हवाई प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

इंडिया ए टीम कोरोनाच्या छायेत

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. वरिष्ठ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी इंडिया ए टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याठिकाणी पोहचली आहे. चार दिवसीय तीन सराव सामन्याला त्यांनी सुरुवातही केली. या संघात अनेक वरिष्ठ संघातील खेळाडूंचाही समावेश आहे.

असा आहे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा

17 डिसेंबबर ते 21 डिसेंबर पहिला कसोटी सामना जोहन्सबर्ग 1:30 PM

26 डिसेंबर ते 30 डिसेंबबर दुसरा कसोटी सामना, सेंच्युरीयन 1:30 PM

3 जानेवारी ते 7 जानेवारी तिसरा कसोटी सामना, केप टाउन 1:30 PM

वनडे मालिका

11 जानेवारी पहिला वनडे सामना, पर्ल 2:00 PM

14 जानेवारी दुसरा वनडे सामना, केप टाउन 2:00 PM

16 जानेवारी तिसरा वनडे सामना, केप टाउन 2:00 PM

टी-20 मालिका

19 जानेवारी पहिला टी-20 सामना, केप टाउन 7:30 PM

21 जानेवारी दुसरा टी-20 सामना, केप टाउन 7:30 PM

23 जानेवारी तिसरा टी-20 सामना, पर्ल 7:30 PM

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधान, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Rate Hike : चांदीला सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची ‘चांदी’, ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान तब्बल १७ हजार रुपयांची चढ-उतार

Theur Accidents : पुन्हा दोन अपघात, दोन मृत्यू! थेऊर परिसरात थरार; एका मोटारचालकावर गुन्हा, दुसऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

सोलापूरच्या ६७ वर्षीय 'सीए'ला २.२८ कोटींचा गंडा! सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटचे आमिष दाखविले, एक लाखास २५ हजाराचा परतावा लगेच दिला, नंतर...

SCROLL FOR NEXT