Gautam Gambhir New Head Coach sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Gautam Gambhir: गौतम गंभीर कोच झाल्यावर बदलणार टीम इंडियाचे चित्र; रोहित-विराटचं भविष्य काय?

Gautam Gambhir New Head Coach: गौतम गंभीर लवकरच टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. यासंदर्भात बीसीसीआयने 18 जून रोजी गंभीरची मुलाखतही घेतली होती.

Kiran Mahanavar

Gautam Gambhir Team India Head Coach: गौतम गंभीर लवकरच टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. यासंदर्भात बीसीसीआयने 18 जून रोजी गंभीरची मुलाखतही घेतली होती. वृत्तानुसार, गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदासाठी काही अटी होत्या, ज्या बीसीसीआयने मान्य केल्या आहेत.

गौतम गंभीर जर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला तर भारतीय संघात किती बदल होईल आणि सध्याचे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुढे काय होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

खरं तर, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी व्यतिरिक्त सर्वात जास्त बदल टी-20 संघात पाहायला मिळतील. चाहत्यांना हे बदल झिम्बाब्वेसोबतच्या टी-20 मालिकेदरम्यानच पाहता मिळतील. झिम्बाब्वे दौऱ्यावर अनेक युवा खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतात. गौतम गंभीरचे पहिले लक्ष युवा टीम इंडियाच्या उभारणीवर असेल. त्याचबरोबर सीनियर खेळाडूंना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणतो की, गौतम गंभीर जर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला तर भारताच्या वरिष्ठ खेळाडूंसाठी खूप काही बदलेल. गंभीरसाठी हा कार्यकाळ खूपच मनोरंजक असणार आहे. संघात बदल करणेही गंभीरसाठी सोपे जाणार नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन जे 30, 35 आणि 37 वयोगटातील आहेत. अशा परिस्थितीत टी-20 क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Restrooms: हे वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; कोर्टातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत स्थिती अहवाल सादर

PAK vs SA Test: पाकड्यांचे घरच्या मैदानावर वस्त्रहरण; दक्षिण आफ्रिकेने दाखवली जागा; WTC मध्ये दिला शेजाऱ्यांना धक्का

Crime News : पतीचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, विरोध करणाऱ्या पत्नीची गोळ्या घालून हत्या; १० वर्षांच्या मुलाने सांगितली हकीकत

तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

Premachi Goshta 2 Review: मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्याचा सर्वांगसुंदर कलाविष्कार, कसा आहे ललितचा 'प्रेमाची गोष्ट २' सिनेमा?

SCROLL FOR NEXT