Gulbadin Naib AFG vs BAN esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

AFG vs BAN : अफगाणी भाबडेपणा! कोच ट्रॉटचा इशारा अन् स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीननं थेट पायच धरला; Video व्हायरल

T20 World Cup 2024 : बांगलादेश - अफगाणिस्तान सामना तसा अटतटीचा होता. मात्र गुलबदीन नैबने असं काही केलं की सर्वांनाच हसू आवरता आवरेना.

अनिरुद्ध संकपाळ

Gulbadin Naib Fake Cramp Acting Video : अफगाणिस्तानने बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 116 धावांचे आव्हान ठेवले होते. अफगाणिस्तानने देखील भेदक मारा करत सामना अटीतटीचा केला. सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. त्यात बॉल टू रन सुरू असेलल्या सामन्यात अफगाणिस्तानचे कोच बाऊंड्री लाईनवरच फेऱ्या मारत होते.

पाऊस, डकवर्थ लुईस अन् नेट रनरेटच्या घाई गडबडीत अफगाणिस्तानचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पावसाची शक्यता आहे खेळ थोडा संथ करा असा इशारा केला. कोचचा इशारा शिरस्ता मानत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नैबनं असं काही केलं की अफगाणी खेळाडूंसोबतच बांगलादेशचे खेळाडू देखील हसू लागले.

स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नैबने हात उंचावत ट्रॉट यांच्या इशाऱ्याला प्रतिसात दिला अन् थेट पाय धरून क्रॅम्प आल्याचं नाटक करून लागला. त्यानं ज्या तत्परतेनं अन् भाबडेपणानं हे नाट केलं ते पाहून सर्वांनाच हसू आले.

गुलबदीन टीकेचा धनी

गुलबदीनच्या या कृतीवर समालोचक आणि नेटकऱ्यांनी देखील टीका केली. हे खेळभावनेला धरून नाही. सामन्याचा निकालावर परिणाम होईल असं हे मुद्दाम केलेलं कृत्य आहे असे सामालोचक सायमन डल म्हणाले.

कर्णधार राशिद झाला नाराज

दरम्यान, गुलबदीनच्या कृतीनंतर निर्माण झालेल्या गोंधळावर राशिद खानने प्रतिक्रिया दिली. त्याला पहिल्यांदा काय सुरू आहे हेच काळलं नाही. त्यानंतर या संपूर्ण घटनेवर त्यानं नाराजी व्यक्त केली. तो नैबकडे गेला अन् त्याच्या दुखापतीची चौकशी केली.

तेवढ्यात पाऊस आला अन् सर्वांनाच मैदान सोडावं लागलं. यामुळं नैबचा चलाखी लपून गेली. मात्र सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर नैब मैदानात पट्टी बाधून आला. मात्र गोलंदाजी करताना त्यानं पट्टी काढली अन् गोलंदाजी केली. सामना संपल्यानंतर देखील नैबने मैदानात जोरदार स्प्रिंट मारली. त्यामुळं त्याची दुखापत किती खरी किती खोटी याची चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT