Hardik Pandya And SuryaKumar Yadav Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

हिटमॅनसह सूर्याही चमकला; टीम इंडियाने उडवला कांगारुंचा धुव्वा

स्टीव्ह स्मिथची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

सुशांत जाधव

T20 World Cup, India v Australia Warm up Match : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेपूर्वी दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय आघाडीच्या फलंदाजांनी फोल ठरवला. डेव्हिड वॉर्नरच्या साथीनं खुद्द कर्णधार फिंचनं संघाच्या डावाला सुरुवात केली. दोघही सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. धावा करण्यात संघर्ष करणारा डेव्हिड वॉर्नर अश्विनच्या जाळ्यात अडकला तर रविंद्र जाडेजानं फिंचला चालते केले.

आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर स्टीव्ह स्मिथनं केलेल्या 57 धावा, मॅक्सवेलनं केलेली 37 धावांची खेळी आणि स्टॉयनिसच्या 25 चेंडूतील 41 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीची जोडीनं दमदार सुरुवात केली. लोकेश राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भक्कम भागीदारी केली.

लोकेश राहुल 31 चेंडूत 39 धावा करुन माघारी फिरला. एगरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सुर्यकुमार यादव फलंदाजीला आला. दुसरीकडे रोहित शर्माने 41 चेंडूत 60 धावा करुन रिटायर हर्ट झाला. सूर्याच्या 27 चेंडूतील 38 धावा आणि हार्दिक पांड्यानं केलेल्या 8 चेंडूतील 14 धावांच्या खेळीनं भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने 17.5 षटकात विजय नोंदवला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बॅटिंगमध्ये विश्रांती घेणाऱ्या विराट कोहलीने गोलंदाजीत हात आजमवला. त्याने 2 षटकात 12 धावा खर्च केल्या. बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली होती. भारताकडून अश्विनने 2 षटकात सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जाडेला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT