IND vs AUS Playing 11  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AUS Playing 11 : ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोहम्मद सिराजची लागणार वर्णी; कुलदीप यादवला सोडावे लागणार स्थान?

T20 World Cup 2024 : भारतीय संघ सेमी फायनलमध्ये जवळपास पोहचला असून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात संघात बदल करण्याची संधी आहे.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia t20 World Cup 2024 : भारत यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपला शेवटचा सुपर 8 चा सामना खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध डॅरेल सॅमी स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपला गेला सामना हरल्यामुळे आता त्यांच्यासाठी करो या मरो स्थिती आहे. अफगाणिस्तानने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे सेमी फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताचे आव्हान पार करावे लागणार आहे.

भारताने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. या पाच सामन्यात भारताने फक्त एकाच खेळाडूला चेंज केलं आहे.

कुलदीप यादव बाहेर जाणार?

भारतीय संघाने खेळपट्टी आणि परिस्थिती पाहून आपल्या संघात बदल केला आहे. अमेरिकेतील सामन्यांमध्ये भारत तीन वेगवान गोलंदाज घेऊन मैदानावर उतरली. त्यावेळी प्लेईंग 11 मध्ये मोहम्मद सिराज खेळला होता. कुलदीप यादवला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं.

मात्र आता गेले दोन सामने भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये खेळत असल्याने फिरकीपटू कुलदीप यादवला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली असून मोहम्मद सिराज बेंचवर आहे. आता भारतीय संघ ग्रॉस आईलेट येथील डॅरेल सॅमी स्टेडियमवर खेळणार आहे.

या स्टेडियमवर देखील फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कुलदीप यादवची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित आहे. त्याने गेल्या दोन सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या हा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सध्या तरी सिराजला संधी मिळेल असे दिसत नाहीये.

संघात होणार नाही कोणताही बदल

भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कारण संघातील सर्व फलंदाज सेटल असून ते संधी मिळताच धावा करत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनी धावा केल्या आहेत.

दुसरीकडे फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा देखील जम बसला आहे. या मैदानावर आफ्रिका विरूद्ध इंग्लंड सामन्यात फिरकीपटूंनी 12 षटकात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT