india vs ireland t20 world cup 2024 SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Ire T20 WC 2024 : 'खेळपट्टी दोनही संघांसाठी एकसारखे आहे मग त्या...' सामन्याआधी कोच राहुल द्रविडने मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

India vs Ireland T20 World Cup 2024 : सगळेच वातावरण जरा वेगळे आहे. नेहमी आम्ही वर्ल्डकपसारख्या स्पर्धेला येतो तेव्हा भल्यामोठ्या स्टेडियमवर सराव आणि सामने होतात. आत्ताच्या घडीला एका पार्कमध्ये आम्ही सराव करत आहोत. शांत वातावरण आहे, सगळेच जरा वेगळे आहे, असे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड सांगत होते.

टी-२० क्रिकेट प्रकारात कोणताच संघ कमजोर मानता येत नाही. त्यातून आयर्लंड संघाला भरपूर अनुभव आहे. टी-२० सामने खेळायचा म्हणून आम्ही त्यांना कमजोर मानायचा कणभरही प्रश्न येत नाही. चर्चा करताना आम्ही इतकेच एकमेकांना बजावत आहोत की स्थानिक वातावरण, खेळपट्टी सगळेच दोनही संघांसाठी एकसारखे आहे. मग त्या वातावरणाशी जुळवून घेता यायला हवे, असे द्रविड यांनी सांगितले.

आम्ही अगोदरच्या सामन्यात कशी खेळपट्टी होती याचा जास्त विचार करणार नाही, कारण भारताच्या सामन्यासाठी कदाचित वेगळी खेळपट्टी असेल ज्याचा स्वभाव वेगळा असेल. त्या त्या वेळची परिस्थिती बघून खेळात बदल करून सामन्यात परिणाम साधणारा खेळ करता यायला हवा, असे माझे मत आहे, राहुल द्रविड म्हणाले.

संघ जाहीर केला नसला तरी आम्हाला कल्पना आहे की, ११ जणांच्या यादीत कोणाची नावे असणार? सामन्याच्या दिवशी खेळपट्टीचा अंदाज घेऊन एखादा बदल केला तरच नाहीतर सगळे पक्के आहे, द्रविड यांनी हसत हसत भरवसा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT