India Vs Pakistan T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak : पाकिस्तानवर टांगती तलवार... आज स्पर्धेतून होणार बाहेर? नाणेफेक महत्त्वाची पण भारताचं पारडं जड

३५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नसाऊ कौंटी मैदानावरची एक नि एक खुर्ची रविवारच्या सामन्याला भरलेली असेल इतकी या सामन्याच्या तिकिटांना मागणी आहे.

Kiran Mahanavar

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आणि अमेरिकेकडून पराभूत झाल्यामुळे हेलखावे खाणारा पाकचा संघ अशी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील बहुचर्चित लढत आज होत आहे. बेभरवशाची खेळपट्टी कसा रंग दाखवणार यावर भवितव्य अवलंबून असले तरी हा सामना जिंकून पाकिस्तानला अगोदरच स्पर्धेबाहेर काढण्याची संधी भारतासमोर आहे.

टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघावर पूर्ण वर्चस्व राखले आहे. सातपैकी पाच सामने भारतीय संघाने दणक्यात खेळ करून जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आणि २००७ साली बॉल आउट प्रकारातही भारताची सरशी झाली होती. एकमेव अपवाद २०२२च्या संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तान संघाने भारतावर मोठा विजय मिळवला होता.

नाणेफेक महत्त्वाची

रविवारच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करायला मिळणाऱ्या संघाला फायदा होणार आहे. पाकिस्तानकडे असलेल्या चार दर्जेदार वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसा खेळ होतो यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहंमद आमीर आणि हॅरीस रौफ हे चारही गोलंदाज वेगवान मारा करू शकतात. पाकिस्तानचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीयेत हीच त्यांची कमजोरी आहे, ज्यावर हल्ला करायला जसप्रीत बुमरा तयार आहे. खेळपट्टीचा अंदाज घेता भारतीय संघ कमीतकमी सात फलंदाजांना संघात ठेवेल. अगदीच झाला तर अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादव हा एकमेव बदल शक्य आहे.

...तरीही रोहित खेळणार

आयर्लंडसमोरच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक केल्यावर पायाच्या दुखापतीने रोहित शर्मा तंबूत परतला होता. सामन्याच्या अगोदर सराव करतानाही रोहित शर्मा किंचितसा लंगडत होता. संघ व्यवस्थापन रोहितची दुखापत गंभीर नसल्याचे सांगत आहे. म्हणजेच रविवारच्या सामन्यात रोहित संघाचे नेतृत्व करायला मैदानात उतरणार आहे.

चांगल्या खेळपट्टीचे आश्वासन

न्यूयॉर्क मैदानाच्या खेळपट्टीवरून कडाडून टीका झाली आहे. आयसीसीने जातीने लक्ष घालून त्यात लक्षणीय सुधारणा होण्यासाठी मेहनत घेतली आहे. रविवारच्या सामन्यासाठी सुधारित म्हणजे संपूर्णपणे गोलंदाजांचे लाड करणारी खेळपट्टी नसेल, असा भरवसा दिला जात आहे. नव्या खेळपट्टीवर भरपूर पाणी मारून मग रोलिंग केले गेले असल्याचे समजले. तसेच गेले दोन दिवस मैदानाच्या भागात पावसाळी वातावरण असल्याने खेळपट्टीला तडे जाण्याचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तरीही अंदाज यावा, म्हणून नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली गोलंदाजी करेल हे नक्की आहे.

पावसाचे भाकीत

रविवारी नेमका सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येण्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी असल्याने पावसाने घोळ घालता तरी सामना पाऊस थांबल्यावर पूर्ण करायला पुरेसा वेळ आहे आणि नसाऊ कौंटीचे रेतीचे मैदान पाण्याचा निचरा होण्यास चांगले असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टेडियम होणार हाऊसफुल्ल

३५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नसाऊ कौंटी मैदानावरची एक नि एक खुर्ची रविवारच्या सामन्याला भरलेली असेल इतकी या सामन्याच्या तिकिटांना मागणी आहे. अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट रसिक केवळ ही लढत अनुभवायला न्यूयॉर्कला येत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लोक तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसले आहेत. एकंदरीत भारत- पाकिस्तान लढतीसाठी क्रिकेटचा रंगमंच सज्ज झालाय, असेच म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 6 सप्टेंबर 2025

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT