Virat-Kohli-Toss-Happy 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SCO: कोहलीला मिळालं बर्थ डे गिफ्ट... अखेर टॉस जिंकला!

नाणेफेक जिंकून भारताची पहिली गोलंदाजी; पाहा Playing XI | India vs Scotland

विराज भागवत

नाणेफेक जिंकून भारताची पहिली गोलंदाजी; पाहा Playing XI | India vs Scotland

India vs Scotland, T20 World Cup: भारतीय संघाने स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. भारतीय संघासाठी आजचा आणि पुढचा (नामिबिया विरूद्ध) सामना मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यकच आहे. मात्र, आजच्या सामन्यात महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल सहा वेळा टॉस हारल्यानंतर आज भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकली. टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यापासून पहिल्या तीनही सामन्यात विराटने नाणेफेक गमावली होती. पण आज वाढदिवसाच्या खास निमित्तावर टॉसनेच विराटला 'बर्थ डे' गिफ्ट दिलं. आता स्कॉटलंडविरूद्ध भला मोठा विजय साकारून टीम इंडिया विराटला वाढदिवसाची भेट देते का, त्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, भारत आणि स्कॉटलंड यांच्या याआधी कधीही क्रिकेट सामना झालेला नाही. आतापर्यंत भारतीय संघाने अनेक टी२० क्रिकेट सामने खेळले आहेत. प्रत्येक टी२० विश्वचषक स्पर्धेत तसेच ICC ने आयोजित केलेल्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाने सहभाग नोंदवला आहे. पण इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आज पहिल्यांदा भारतीय संघ स्कॉटलंडशी दोन हात करत आहे. आजतागायत भारत आणि स्कॉटलंड यांच्यात एकही क्रिकेट सामना झालेला नाही. त्यामुळे एका अर्थी आज क्रिकेटच्या मैदानावर इतिहासाच घडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाला मोठं वळण! आरोपीबाबत बाल न्याय मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Raigad News: मुसळधार पावसाची ठिकाणं प्रशासनाकडून दुर्लक्षित, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर सुट्टीचे आदेश जारी; पालक संतप्त

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

SCROLL FOR NEXT