Mohammed Siraj Mohammad Rizwan  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak : सामन्यात टळली मोठी दुर्घटना! सिराजच्या 'त्या' बॉलवर थोडक्यात वाचला मोहम्मद रिझवान; डोक्यात...

T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान सिराज अन् रिझावनमध्ये उद्भवला असता वादाचा प्रसंग, मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj Mohammad Rizwan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटल्यावर सर्व खेळाडू चार्जअप असतात. टी 20 वर्ल्डकप 2024 मधील भारत आणि पाकिस्तान सामना देखील असाच अटीतटीचा झाला. भारतानं 120 धावांचे माफक आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने 10 षटकात 2 बाद 57 धावा करत दमदार सुरूवात देखील केली होती.

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा एका बाजूने किल्ला लढवत होता. रिझवान भारताची डोकेदुखी ठरत होता. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करतावा असं काही केलं की त्यामुळं भारत - पाकिस्तान सामन्यावेळी वादाची स्थिती निर्माण झाली असती.

भारताचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. रिझवान हा भारतीय गोलंदाजांचा स्विंग काऊन्टर करण्यासाठी क्रीजच्या खूप पुढे उभा राहिला होता. हेच हेरून सामन्याच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजनं रिझवानला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानं चेंडू रिझवानच्या दिशेने जोराने फेकला.

मात्र रिझवान क्रीजमध्ये परत जाण्यासाठी डाईव्ह मारला. याच दरम्यान सिराजचा थ्रो रिझवानच्या डोक्याजवळून जात हातावर लागला. थ्रोनंतर रिझवानने कळवळत धाव घेण्याचा प्रयत्न केला. धाव पूर्ण होत असताना मोहम्मद सिराजने रिझवानची माफी मागून खिलाडू वृत्ती दाखवली. रिझावननं ही मोठ्या मनानं त्याला माफ करून टाकलं.

मात्र सिराजचा थ्रो जरा जरी इकडे तिकडे झाला असता तर चेंडू थेट रिझवानच्या डोक्याला लागला असता. मात्र सुदैवानं मोठी दुर्घटना टळली.

सामन्याबद्दल बोलायंच झालं तर भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आपला दुसरा विजय प्राप्त केला. तर पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला सलग दुसरा सामना गमवला. याचबरोबर पाकिस्तानचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान देखील जवळपास संपुष्टात आलं आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

AAP MLA Arrested: १८ एफआयआर अन् अनेक तक्रारी... आम आदमी पक्षाच्या एकमेव आमदारांना अटक, नेमका आरोप काय?

Latest Marathi News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील हडसन जवळ चौथ्या वाहनाचा अपघात

ऐश्वर्य ठाकरेचा 'निशानची' सिनेमात धमाल डान्स ; 'पिजन कबूतर' गाणं सोशल मीडियावर रिलीज

Mumbai News: मुलांमध्ये वेगाने पसरतोय फ्लू आणि डेंग्यू; स्वच्छतेची खबरदारी घेण्याचा सल्ला

SCROLL FOR NEXT