INDIA vs PAKISTAN  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: पुढचा भारत - पाक सामना होणार लाहोरमध्ये? CT बाबत पीसीबीने दिली मोठी अपडेट 

Champions Trophy 2025: भारताला आता पाकिस्तानला पाकिस्तानात मात देण्याची संधी आहे. मात्र यासाठी....

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Champions Trophy 2025 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार पाहावयास मिळतो. त्यामुळे आता पुन्हा कधी हे दोन सख्खे शेजारी भिडणार याची उत्सुकता सर्वांना आहे. जवळपास 8 महिन्यांनी पुन्हा एकदा भारत - पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान हा सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेड्युलचा ड्राफ्ट आयसीसीला सादर केला आहे.

लाहोरमध्ये होणार भारत - पाकिस्तान सामना

15 सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान सामना हा लीग स्टेजमधील शेवटचा सामना असले. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. याबाबतची माहिती क्रिकबझने दिली आहे.

भारत पाकिस्तान सामना हा लाहोरच्या ऐतिहासिक स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्याला अजून भारतीय सरकारने परवानगी दिलेली नाही. भारत सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेल नाही.

पीसीबीने चॅम्पिन्स ट्रॉफीमधील सामने हे लाहोर, कराची आणी रावळपिंडी येथे खेळवण्याची योजना आखली आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार का हे अजून गुलदस्त्यात आहे.

हायब्रीड मॉडेल

जर भारत सरकार भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत हायब्रीड मॉडेलचा विचार केला जाऊ शकतो. 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये याच प्रकारचे हायब्रीड मॉडेल तयार करण्यात आले होते. अशा परिस्थितीत भारताचे सामने युएईमध्ये होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने सुरू केली तयारी

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार की नाही हे अजून निश्चित नसलं तरी पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू केली आहे.

तयार केलेल्या शेड्युलप्रमाणं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उद्घाटनाचा आणि दोन्ही सेमी फायनल सामने कराची आणि रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहेत. तर अंतिम सामना हा लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Female Doctor Case: हे तर गलिच्छ राजकारण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं..

Panchang 27 October 2025: आजच्या दिवशी मंगल चंडिका स्तोत्र पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT