Ritika Sajdeh esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ritika Sajdeh : बार्बाडोस वादळानंतर रोहितची पत्नी रितिकाने केलेली पोस्ट का होतेय तुफान व्हायरल?

T20 World Cup 2024 Barbados Hurricane : बार्बाडोसमधील वादळानंतर रितिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Ritika Sajdeh Instagram Story : भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये टी 20 वर्ल्डकपची फायनल जिंकली अन् तब्बल 13 वर्षांनी वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. ट्रॉफीसह टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक असताना बार्बाडोसमधील वादळामुळे टीम हॉटेल रूममध्येच अडकून पडली. बार्बाडोसच्या सरकारने विमानतळच बंद केलं होतं.

आज टीम इंडिया विशेष विमानाने मायदेशासाठी रवाना झाली आहे. भारतीय संघ चार जुलैला टीम इंडिया भारतात दाखल होणार आहे. दरम्यान, रोहित शर्माची पत्नी रितिका देखील या वादळामुळे अडकून पडली होती. तिने या वादळाची काही विदारक दृष्ये आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवली.

रितिकाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर मृत माशाचा आणि कासवाच्या अंड्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंवरून या वादळाचा समुद्रातील जीवांवर झालेला परिणाम दिसून येतो.

गेल्या तीन दिवसांपासून बार्बाडोसमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. दरम्यान, वादळाची तीव्रता कमी झाल्यावर आज (3 जुलै) एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतीय संघ मायदेशात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. या विमानात भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ, कोचिंग स्टाफ याचबरोबर खेळाडूंचे नातेवाईक आणि बार्बाडोसमध्ये अडकलेले पत्रकार यांचा देखील समावेश आहे. हे सर्व एकाच विमानाने परत येत आहेत.

भारतीय संघाला घेऊन येणारे विमान 4 जुलै सकाळी 6 वाजता भारतात दाखल होईल. त्यानंतर 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. तिथे नाष्टा केल्यानंतर विशेष विमानाने भारतीय संघ मुंबईत दाखल होईल. मुंबईत दाखल झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक देखील आयोजित केली आहे. वानखेडेवर खेळाडूंना 125 कोटी रूपयांच्या बक्षीस रक्कमेचे वितरण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT