Saurabh Netravalkar T20 World Cup 2024  Esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Saurabh Netravalkar : सौरभचा अभ्यास पक्का; विराट पाठोपाठ रोहित शर्माचीही केली शिकार

USA vs IND T20 World Cup 2024 : सौरभ नेत्रावळकरने भारताचे दोन तगडे फलंदाज अवघ्या दोन षटकात माघारी धाडले.

अनिरुद्ध संकपाळ

Saurabh Netravalkar : भारताच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने युएसएला नोमोहरम करून टाकलं. मात्र युएसएच्या डावखुऱ्या सौरभ नेत्रावळकरने देखील भारताला मोठा धक्का दिला. त्याने भारताची रन मशिन विराट कोहलीला शुन्यावर बाद केलं. सौरभने पहिल्याच चेंडूवर विराटला विकेटकिपरकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानंतर आपल्या पुढच्याच षटकात सौरभ नेत्रावळकरने मुंबईकर रोहित शर्माला देखील पॅव्हेलियनची वाट धरायला लावली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत युएसएला 110 धावात रोखले. त्यानंतर भारताने आपल्या डावाची सुरूवात केली. मात्र युएसएचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने भेदक मारा करत भारताला दोन धक्के दिले. त्याने इनिंगच्या पहिल्याच षटकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चकवा दिला. त्याने विराट कोहलीला दुसऱ्या चेंडूवर शुन्यावर बाद केलं. हा विराटचा सामन्यातला पहिलाच चेंडू होता.

विराट कोहली ज्यावेळी बाद झाला त्यावेळी रोहित शर्माची रिअॅक्शन बघण्यासारखी होती. पहिले षटक संपल्यानंतर रोहित आणि ऋषभरने भारताला 10 धावांपर्यंत पोहचवले. मात्र तिसरे षटक घेऊन आलेल्या नेत्रावळकरने पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का दिला. यावेळी देखील षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नेत्रावळकरने रोहितला 3 धावांवर बाद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT